LPG चा तुटवडा, पण PNG चालू! पाइप लाइनद्वारे येणारा गॅस येतो तरी कुठून? पाहाच
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या झळा या भारतापर्यंत पोहोचल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात एलपीजीचा तुटवडा जाणवतोय. ज्यामुळे लोकांना अगदी काटकसरीने त्याचा वापर करावा लागतो. पण पाइपद्वारे येणाऱ्या पीएनजी गॅस तुटवड्याची कोणतीच चर्चा नाही. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया...
advertisement
advertisement
PGG आणि LPG मध्ये फरक काय? : पीएनजी म्हणजेच पाइप्ड नॅच्युरल गॅस मुख्यतः मीथेन गॅस असतो. हा गॅस थेट पाइपलाइनच्या माध्यमातून घरापर्यंत पोहोचतो. यात सिलेंडर भरणे किंवा डिलिव्हरीची वाट पाहण्याची गरज नसते. तसंच एलपीजी प्रोपेन आणि ब्यूटेनचं मिश्रण आहे. जे सिलेंडरमध्ये भरुन सप्लाय केलं जातं. हे मुख्यतः कच्च्या तेलाच्या रिफायनिंगने तयार केलं जातं.
advertisement
पाइपमधून येणारा गॅस कुठून येतो? : भारतात पीएनजीच्या पुरवठ्याचे दोन सोर्स आहेत. एक घरगुती गॅस उत्पादन आणि एक आयात केलं जाणारं LNG (लिक्विफआइड नॅच्युरल गॅस). देशात कृष्णा-गोदावरी बेसिन, आसाम आणि त्रिपुरा सारख्या भागांमध्ये नैसर्गिक गॅस निघतो. विशेषतः KG बेसिन भारतातील गॅस उत्पादनाचा मोठा भाग देते. या व्यतिरिक्त भारत कतार, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमधून LNG आयात करते. जे नंतर गॅसमध्ये रुपांतरीत करुन पाइपलाइन नेटवर्कच्या माध्यमातून घरांपर्यंत पोहोचवले जाते.
advertisement
इराण युद्धात LPG का अडकलेय? : एलपीजी गॅसची सर्वात मोठी कमकुवत गोष्ट म्हणजे त्याची सप्लाय चेन आहे. भात आपल्या गरजेच्या 60% एलपीजीची गरज बाहेरच्या देशांतून आयात करते. यातील जवळपास 90% पुरवठा स्ट्रेट ऑफ होर्मुजहून येते. मिडिल ईस्टमद्ये तणाव वाढल्याने या समुद्र रस्त्यावर धोका वाढलाय. ड्रान हल्ले आणि मिसाइल हल्ल्यामुळे टँकर मूव्हमेंटवर परिणाम झालाय. ज्यामुळे एलपीजीच्या पुरवठ्यात उशीर होतोय. यासोबतच तुटवडाही निर्माण झालाय.
advertisement
PNG जास्त सुरक्षित का? : पीएनजी हे निरंतर सप्लाय सिस्टमवर काम करते. हा गॅस पाइपलाइनच्या माध्यमातून थेट घरापर्यंत पोहोचतो. ज्यामुळे यात सिलेंडर प्रमाणे लॉजिस्टिक्सचा धोका नसतो. सोबतच पीएनजीचा मोठा भाग भारतातच निर्माण होतो. इतर LNG वेगवेगळ्या देशांमधून आयात केला जातो. म्हणजेच पुरवढ्याचा सोर्स एकाच ठिकाणावर अवलंबून नाही. ज्यामुळे जोखिम ही अत्यंत कमी आहे.
advertisement
सरकार PNG ला वापरण्याला प्रोत्साहन का देतेय? : सरकार मानते की, PNG, LPG च्या तुलनेत जास्त सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. याच कारणामुळे ज्या भागांमध्ये पाइपलाइनची सुविधा आहे. तिथे लोकांना पीएनजी कनेक्शन घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातंय. हे पाऊल देशाती ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी उचलण्यात आलंय. जेणेकरुन जागतिक संकटाचा लोकांवर काहीच परिणाम होऊ नये.








