advertisement

KKR vs MI : हार्दिकचा 'नो लूक टॉस' अन् वाद पेटला! अजिंक्य रहाणेला कळायच्या आत झाला गेम? Video चर्चेत

Last Updated:

IPL 2026 MI vs KKR Toss controversy : आयपीएलच्या दुसऱ्याच सामन्यात टॉस न दाखवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. पांड्याने पुन्हा टॉस लांब फेकला.

IPL 2026 MI vs KKR Toss controversy
IPL 2026 MI vs KKR Toss controversy
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : नमस्कार मुंबई... म्हणत रवी शास्त्री यांनी टॉसला सुरूवात केली. हार्दिक पांड्याच्या हातात टॉस होता. रेफरीच्या इशाऱ्यानंतर हार्दिक पांड्याने टॉस उधळला. त्यावेळी अजिंक्य रहाणे याने टेल्स असा कॉल दिला. त्यावेळी पांड्याने पुन्हा कॉईन लांब उधळला. जेव्हा कॉइन जमिनीवर पडला, तेव्हा कॅमेरावर हेड पडले की टेल हे स्पष्टपणे दाखवलं गेलं नाही. कॉइनची बाजू न दाखवताच थेट मुंबई इंडियन्सला टॉसचा विनर घोषित करण्यात आलं, त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या गेल्या.

कॅमेरा कॉइनवरून हटवण्यात आला?

टॉसच्या या प्रकारानंतर नेटिझन्सनी संताप व्यक्त करत याला 'टॉस फिक्सिंग' असं नाव दिलं आहे. काही चाहत्यांनी जाणीवपूर्वक कॅमेरा कॉइनवरून हटवण्यात आल्याचा आरोप केला आहे. मुंबई इंडियन्सच्या मॅचेसमध्येच अशा तांत्रिक चुका किंवा संशयास्पद गोष्टी वारंवार कशा घडतात, असा प्रश्न विचारत चाहत्यांनी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.
advertisement

अजिंक्य रहाणे काहीसा गोंधळला

advertisement
हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यावेळी केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याने वानखेडेच्या पिचबद्दल कमालीचे आश्चर्य व्यक्त केले. रहाणे म्हणाला की, त्याने वानखेडेच्या पिचवर यापूर्वी कधीही इतके गवत पाहिले नव्हते. प्रॅक्टिससाठी वापरण्यात आलेली खेळपट्टी आणि प्रत्यक्ष मॅचची खेळपट्टी यामध्ये मोठी तफावत असल्याचे पाहून रहाणे काहीसा गोंधळलेला दिसलेला दिसला.
advertisement

पहिली बॉलिंगच केली असती

दरम्यान, आम्ही टॉस जिंकला असता तरी पहिली बॉलिंगच केली असती, असं अजिंक्य रहाणे यावेळी म्हणाला. मात्र, टॉस गमावल्यानंतरही केकेआरने बॅटिंगमध्ये दमदार कामगिरी केली. अजिंक्य रहाणे याने अफलातून कामगिरी करत अर्धशतक ठोकलं होतं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
KKR vs MI : हार्दिकचा 'नो लूक टॉस' अन् वाद पेटला! अजिंक्य रहाणेला कळायच्या आत झाला गेम? Video चर्चेत
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement