इंदापुरात थरारक पाठलाग! पोलिसांनी गाडी अडवली; प्लास्टिक ड्रम उघडताच खळबळ, सोलापूर आणि साताऱ्यापर्यंत धागेदोरे
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
हे तस्कर गोव्याहून कच्च्या स्वरूपात दारू आणत असत. पुण्यात आणल्यानंतर ती रॉयल स्टॅग आणि इम्पेरियल ब्ल्यू सारख्या नामवंत ब्रँडच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरली जात असे.
पुणे: गोव्यातील स्वस्त दराचे मद्य प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून महाराष्ट्रात आणायचे आणि नामांकित ब्रँडच्या बाटल्यांमध्ये भरून चढ्या दराने विकायचे. आता या अट्टल टोळीला पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथे फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ही कारवाई करण्यात आली. यानंतर याचे धागेदोरे सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांपर्यंत पोहोचले आहेत.
हे तस्कर गोव्याहून कच्च्या स्वरूपात दारू आणत असत. पुण्यात आणल्यानंतर ती रॉयल स्टॅग आणि इम्पेरियल ब्ल्यू सारख्या नामवंत ब्रँडच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरली जात असे. त्यावर हुबेहूब दिसणारी बनावट बुचे लावून ग्राहकांची फसवणूक केली जात होती. कांदलगाव-शहा रस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी एका मालवाहू वाहनाला अडवले. त्यात मद्याने भरलेले २५ प्लास्टिक ड्रम आणि तब्बल १ हजार ४०० बनावट बुचे आढळून आली.
advertisement
या कारवाईत पोलिसांनी प्रेम सोमनाथ भडवलकर (रा. बारामती) आणि अक्षय अधिकराव देशमुख (रा. सोलापूर) या दोघांना जागीच अटक केली. आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सोलापूरमधील माढा आणि सातारा जिल्ह्यातील महिमानगड येथे छापे टाकले. तिथे विदेशी दारूच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या आणि सुमारे २ हजार बनावट बुचे असा मोठा साठा सापडला. या संपूर्ण कारवाईत एकूण २० लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
advertisement
एक्साईज विभागाच्या या धडक कारवाईमुळे आंतरजिल्हा मद्य तस्करीची एक मोठी साखळी उखडून टाकण्यात यश आले आहे. बनावट दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने, अशा टोळ्यांविरुद्ध कडक मोहीम राबवली जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 1:14 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
इंदापुरात थरारक पाठलाग! पोलिसांनी गाडी अडवली; प्लास्टिक ड्रम उघडताच खळबळ, सोलापूर आणि साताऱ्यापर्यंत धागेदोरे










