अशोक खरातला रुपाली चाकणकरांची होती साथ? SIT तपासात खळबळजनक खुलासा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला अटक केल्यापासून त्याचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत. आता या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला अटक केल्यापासून त्याचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत. अनेक पीडित महिलांनी पोलिसांकडे धाव घेत अशोक खरातच्या अत्याचाराचा पाढा वाचला आहे. या प्रकरणी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर देखील अडचणीत सापडल्या आहेत. त्यांना राज्य महिला आयोगाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
या सगळ्या घडामोडीनंतर आता रुपाली चाकणकर आरोपी अशोक खरातला त्याच्या वाईट कामांत साथ देत होत्या का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणी नवा खुलासा समोर आला असून महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्यात शिर्डी पोलीस ठाण्यात नीरज जाधव विरोधात गुन्हा दाखल झाला होता. अशोक खरातने अत्याचार केलेल्या एका तरुणीच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अशोक खरात सांगण्यावरून महिला आयोगानं सुनावणी सुनावणी ठेवली होती. याबाबत महिला आयोगाकडून शिर्डी पोलिसांना देखील नोटीस देण्यात आली होती. १७ मार्चला आयोगाच्या कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी ही नोटीस देण्यात आली होती.
advertisement
मात्र या प्रकरणाचा तपास आधीच SIT कडे वर्ग झाल्यानं पोलिसांनी तसा अहवाल महिला आयोगाला दिला होता. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर ५ आणि ९ मार्चला महिला आयोगाकडून सखोल चौकशी आणि सुनावणीचं पत्र दिलं होतं. त्यामुळे शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात महिला आयोगाचा हस्तक्षेप होता, हे दिसून येत आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरचा पाय खोलात जात आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 1:01 PM IST









