Mumbai : वरळीकरांसाठी गुड न्यूज! वाहतूक कोंडीतून होणार सुटका; 2 नवीन पुलांचा गेम चेंजर प्लॅन समोर
Last Updated:
Worli flyover Update : वरळीतील नागरिकांची वाहतूककोंडीतून कायमची सुटका होणार आहे. आता शहराच दोन नवे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. नेमक्या कोणत्या ठिकाणी असणार आहेत आणि कधी वाहतूकीसाठी खुले होतील याबाबत आलेली अपडेट वाचा.
मुंबई : वरळीतील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी दोन नवे पूल सुरु होणार आहे. या नव्या पूलामुळे दोन महत्त्वाच्या ठिकाणातील अंतर हे तब्बल कमी वेळात पार करता येणार आहे. सध्या या प्रकल्पाचे 30 टक्के काम पूर्ण झाले असून कधीपर्यंत हा मार्ग प्रवाशांसाठी खूला होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वरळीकरांचा प्रवास आता होणार सुपरफास्ट!
दक्षिण मुंबईकील वरळी परिसरात गेल्या काही काळापासून वाहतूककोंडीची समस्या ही गंभीर बनली आहे. त्यावर मात करण्यासाठी नेहरु विज्ञान ते नेहरु तारांगण असा जोडण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. ज्याचे काम सध्या नेहरु विज्ञान केंद्राजवळील नाल्यावर अखेर सुरु झालेले आहे. हा प्रकल्पाची मंजूरी तीन वर्षांपूर्वी मिळाली होत मात्र या मार्गात येणाऱ्या झोपड्या आणि अन्य कारणांमुळे हे काम रखडले होते पण आता पुलाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्याची मुदत असली तरी याचे काम पूर्ण होण्याची शक्यता पुढे जाऊ शकते.
advertisement
नेहरु विज्ञान केंद्र आणि नेहरु तारांगण यातील अंतर जवळ असले तरी प्रत्यक्ष पाहिले तर वाहनचालकांना वरळी नाक्यावरील गर्दीतून दोन किलोमीटरचा वळसा घ्यावा लागतो.यातही नेहरु विज्ञान केंद्र असलेल्या नाल्यामुळे ई.मोझेस रोडहून अॅनी बेझंट मार्गाकडे थेट जोडणी नाही, त्यामुळे वाहनचालकांना लोअर परळ, शिवनेरी मार्ग आणि फिनिक्स पॅलेडिएयमच्या मागच्या बाजूने पेडर रोड आणि कोस्टल रोडकडे जाणाऱ्यांनाही वरळी नाक्यातील वाहतूककोंडीतून जावे लागते.
advertisement
नागरिकांना असा होणार फायदा?
पूल पूर्ण झाल्यानंतर वरळी नाका ओलांडण्याची गरज वाहनचालकांना राहणार नाही. जिजामातानगर ते वरळी नाका हा 15 मिनिटांचा प्रवास आता फक्त 5 मिनिटांत पूर्ण होणार आहे. शिवाय पेडर रोड आणि सागरी किनारा रस्त्याकडे थेट दुवा मिळाल्याने वाहतूकोंडी आता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 1:13 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Mumbai : वरळीकरांसाठी गुड न्यूज! वाहतूक कोंडीतून होणार सुटका; 2 नवीन पुलांचा गेम चेंजर प्लॅन समोर








