Aditi Tatkare: बॅनरवर अजितदादा अन् सुनेत्रा पवारांचा फोटो का नव्हता? अदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, ''सुनेत्रा काकींना आमचा...''
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Aditi Tatkare: दिवंगत नेते अजित पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो बॅनरवरून गायब असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती
रायगड: राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगडमधील एका कार्यक्रमात दिवंगत नेते अजित पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो बॅनरवरून गायब असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. यावरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. अखेर या वादावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या अदिती तटकरे?
अदिती तटकरे यांनी या प्रकरणावर भाष्य करताना दिलगिरी व्यक्त केली. "स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांकडून अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. एका ग्रामपंचायत स्तरावरील कार्यक्रमात चुकून अजितदादा आणि सुनेत्राकाकी यांचा फोटो राहिला नसावा. याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते," असे त्या म्हणाल्या.
निष्ठा बॅनरवरून ठरवू नका!
कार्यकर्त्यांच्या निष्ठेबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "अजितदादा आणि सुनेत्राकाकी यांचे आमच्या मनातील स्थान अढळ आहे. केवळ बॅनरवर फोटो नाही म्हणून कोणाची निष्ठा ठरवू नये. बॅनरवर फोटो असणे किंवा नसणे ही तांत्रिक चूक असू शकते, पण पक्षाप्रती असलेली आमची बांधिलकी कायम आहे."
advertisement
स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात, असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले दिवंगत नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी यांचा…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 29, 2026
advertisement
टीकाकारांना सडेतोड उत्तर
या वादाला हवा देणाऱ्या यंत्रणेवर निशाणा साधताना अदिती तटकरे यांनी टोला लगावला. त्या म्हणाल्या, "या निमित्ताने एक गोष्ट चांगली झाली की, स्थानिक पातळीवरच्या छोट्या चुकीचा बाऊ करणारी यंत्रणा कशी काम करते, हे आमच्या लक्षात आले. जे लोक आज हा मुद्दा चवीने चघळत आहेत, त्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल किती पश्चाताप होत असेल, हे देवच जाणे!" तसेच, सुनेत्रा पवार यांना आमचे कान पकडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 2:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Aditi Tatkare: बॅनरवर अजितदादा अन् सुनेत्रा पवारांचा फोटो का नव्हता? अदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, ''सुनेत्रा काकींना आमचा...''








