आनंदी जंगम यांनी सांगितलं की, शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. तसेच विद्यार्थ्यांना इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी देखील प्रेरित केलं जातं. NASA च्या Artemis 2 चंद्रमोहिम होत आहे. या मोहिमेत व्हर्च्युअल सहभागी होण्यासाठी नासाकडून नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आमच्या शाळेतील 16 शिक्षक आणि 32 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली. रजिस्ट्रेशन केलेल्यांना नासाकडून बोर्डिंग पास मिळाले आहेत.
advertisement
नोकरी शोधताय? ही संधी सोडू नका, विविध पदासाठी इथं होणार भरती
सर्व नावे SD कार्डमध्ये टाकून ओरियन यानद्वारे अंतराळवीरांसोबत चंद्राकडे प्रवास करणार आहेत. बोर्डिंग पास मिळालेल्या सर्वांना मेलवर आलेली लिंक उघडून 17 जानेवारीपासून प्रक्षेपणापर्यंतचे महत्त्वाचे क्षण व्हर्च्युअली पाहता येणार आहे. अप्रत्यक्षरीत्या यानद्वारे विद्यार्थ्यांना चंद्रभोवतीच्या प्रवासात जाण्याची संधी भेटली आहे. याशिवाय पुढील महत्त्वाच्या घटना आणि नासाचे उपक्रम या विद्यार्थ्यांना ई-मेल द्वारे कळविण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा दुहेरी फायदा होणार आहे.
नासाची आर्टेमिस-2 मोहिम एप्रिलमध्ये प्रक्षेपित
नासाची आर्टेमिस-2 ही सुमारे 10 दिवसांची मोहिम आहे. ही मोहिम फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरहून एप्रिल महिन्यात प्रक्षेपित होणार आहे. अंतराळवीर चंद्राच्या पलीकडे सुमारे 4,600 मैलांचा प्रवास करून सॅन दिएगो किनाऱ्याजवळील पॅसिफिक महासागरात सुरक्षित उतरणार आहेत. या मोहिमेत नासाचे अंतराळवीर रीड वाईझमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टिना कोच तसेच कॅनेडियन स्पेस एजन्सीचे जेरेमी हॅन्सन हे एसएलएस (स्पेस लॉन्च सिस्टम) रॉकेटद्वारे ओरियन यानातून अवकाशात झेप घेणार आहेत. याच यानात विद्यार्थी व्हर्च्युअली सहभागी होणार आहेत.





