TRENDING:

रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! तांदळाऐवजी गव्हासोबत मिळणार हे धान्य

Last Updated:

Ration Card : राज्य शासनाच्या अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशनकार्डधारकांना नियमितपणे गहू व तांदूळ वितरित केले जातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशनकार्डधारकांना नियमितपणे गहू व तांदूळ वितरित केले जातात. मात्र मार्च महिन्यापासून या वितरण पद्धतीत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तांदळाऐवजी लाभार्थ्यांना गव्हासोबत मका दिला जाणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखो रेशनकार्डधारकांच्या शिध्यात बदल होणार आहे.
Ration Card
Ration Card
advertisement

तांदळाऐवजी मका, तीन महिन्यांसाठी नवा प्रयोग

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात आठ खरेदी केंद्रांवर मका खरेदी सुरू आहे. आतापर्यंत सुमारे १५ हजार क्विंटल मका खरेदी करण्यात आली असून ही खरेदी २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. खरेदी केलेली संपूर्ण मका रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वितरित केली जाणार असल्याने पुढील तीन महिने गव्हासोबत मका मिळण्याची शक्यता आहे.

advertisement

या निर्णयामुळे शिधा वितरणात तात्पुरता बदल झाला असला, तरी शासनाकडून यामागे साठा व्यवस्थापन आणि स्थानिक पातळीवरील उपलब्धतेचा विचार केल्याचे सांगितले जात आहे.

किती मिळणार धान्य?

अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा १० किलो मका आणि ११ किलो गहू दिला जाणार आहे. तर प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी २ किलो गहू आणि १ किलो मका मिळणार आहे.

advertisement

जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे ८७ हजार ६४ रेशनकार्डधारक असून एकूण ३ लाख ८६ हजार ३४ लाभार्थी आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत ६ लाख ३७ हजार ११४ रेशनकार्डधारक असून त्यांचे एकूण २५ लाख ६३ हजार ९७१ लाभार्थी आहेत. या सर्वांना नव्या निर्णयानुसार मका वाटप होणार आहे.

‘मकाचे काय करायचे?’ लाभार्थ्यांमध्ये संभ्रम

रेशन दुकानांमधून नियमितपणे गहू आणि तांदूळ दिले जातात. काही वेळा ज्वारी, साखर, तेल किंवा डाळींचेही वाटप करण्यात आले आहे. यापूर्वी ‘आनंदाचा शिधा’ तसेच साड्यांचेही वितरण झाले होते. मात्र गव्हासोबत मका देण्याचा निर्णय प्रथमच मोठ्या प्रमाणावर घेतला गेला आहे.

advertisement

यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. “मकाचे काय करायचे?” असा प्रश्न काही कुटुंबांकडून उपस्थित केला जात आहे. मका दळून पीठ तयार करणे, भाकरी किंवा इतर पदार्थ बनवणे हे पर्याय असले तरी शहरी भागातील अनेकांना त्याचा वापर कसा करायचा याबाबत माहिती नसल्याचे दिसून येत आहे.

आठ केंद्रांवर खरेदी, दोन ठिकाणी प्रतिसाद नाही

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीचे दर घसरले, आल्याचे भाव तेजीत, डाळींबाची काय स्थिती?
सर्व पहा

जिल्ह्यात नगर, घारगाव, श्रीगोंदा, घोगरगाव, मिरजगाव, शेवगाव, पाथर्डी आणि कोपरगाव येथील फेडरेशन केंद्रांवर मका खरेदी सुरू आहे. मात्र जामखेड आणि संगमनेर येथील केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! तांदळाऐवजी गव्हासोबत मिळणार हे धान्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल