प्रभाकर भलमे आणि नितीन भलमे असं मयत पावलेल्या बापलेकाची नावं आहेत. हल्लेखोर आरोपी हा अल्पवयीन आहे. घटनेच्या दिवशी शनिवारी रात्री भलमे यांच्या नातेवाईकांचं लग्न होतं. याच लग्नात हल्लेखोराने काका प्रभाकर आणि चुलत भाऊ नितीन यांना संपवण्याचा कट रचला. लग्नाची वरात सुरू असतानाच त्याने हा खुनी खेळ केला.
नेमकं प्रकरण काय?
advertisement
शनिवारी रात्री भलमे यांच्या नातेवाईकाचं लग्न होतं. नवरदेव बोहल्यावर चढला होता. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. बँड वाजत होता. वऱ्हाडी नाचत होते. सगळं काही सुरळीत सुरू होतं. जेव्हा ही वरात हनुमान मंदिरात दर्शन घेऊन वरात जात होती. त्याच वेळी संपत्तीच्या वादातून पुतण्याने काका आणी चुलत भावावर चाकू हल्ला केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बरबडी येथील रहिवासी असलेल्या भलमे कुटुंबीयांचे संपतीच्या वादातून आपसात खटके उडत होते. आठ महिन्यापूर्वी सुद्धा अल्पवयीन आरोपी आणि मृतकांमध्ये वाद झाला होता. आरोपी हा त्यांना मारण्याच्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होता. त्याने दोघांना मारण्यासाठी चाकू सुद्धा ऑनलाईन मागवला होता. शनिवारी रात्री नातेवाईकाचं वर्धेत लग्न होतं. या लग्नात त्याने काका आणी चुलत भावाला मारण्याचा कट रचला. वरात ही वाजत गाजत हनुमान मंदिरात पोहचताच पुतण्याने काका आणी भावावर चाकु हल्ला करत जखमी केले. या हल्ल्यानंतर उपस्थित नातेवाईकांनी तातडीने दोघांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं.
एकीकडे लग्नाचा आनंदसोहळा सुरू असताना अचानक झालेल्या चाकुहल्ल्याच्या घटनेनं आनंदात विजरन पडलं. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ माजली असून पोलीस तपास करत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत तातडीने कारवाई केली.
