मिळालेल्या माहितीनुसार, मनमाडच्या वडगाव जवळ ही अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत हरणांचा छोटासा कळप हा पाण्याचा शोधात फिरत होता. पाणी शोधता शोधता या कळपातले काही हरणं ट्रॅकवर आले होते. या दरम्यान ट्रॅकवरून वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने तीन हरणांना भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत हरणांचा अक्षरश चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी हरणाचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच या अपघाताच्या घटनेने प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होतं आहे.
advertisement
दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला अपघात झाल्याची ही घटना काही नवीन नाही. याआधी देखील वंदे भारत एक्सप्रेसला अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेसने वलसाडजवळ एका गायीला धडक दिल्याने अपघात झाला होता. तसेच गांधीनगर मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसन ट्रेनला वटवाजवळ म्हशीचा कळप रूळावर आल्याने अपघाताची घटना घडली होती. या अपघाताच्या काही घटनांमध्ये वंदे भारतचे नुकसान देखील झाले आहे. त्यामुळे या घटनांमुळे वंदे भारत मागचं अपघाताच शुक्लकाष्ठ कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.
