TRENDING:

दुपारी पुण्यात लग्न, तरी मतदानासाठी नवरदेव कराडमध्येच, व्होटींग करताच लग्नाकडे धाव

Last Updated:

कराड तालुक्यातील तांबवे येथील एका नवरदेवाने लग्नाच्या गडबडीतही मतदानाचा हक्क बजावून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विशाल पाटील, प्रतिनिधी कराड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीमुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या मतदानाच्या दिवशी कराड तालुक्यातील तांबवे येथील एका नवरदेवाने लग्नाच्या गडबडीतही मतदानाचा हक्क बजावून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. त्यामुळे या घटनेची राजकीय व सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
News18
News18
advertisement

कराड तालुक्यातील तांबवे येथील बाळासाहेब दादा पाटील यांचे चिरंजीव विक्रम पाटील यांचा विवाह आज पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन येथे प्रकाश अर्जुन राऊळ (रा. वेर्ले, जि. सिंधुदुर्ग) यांची कन्या आदिती यांच्याशी संपन्न होत आहे. लग्नाची वेळ दुपारी ठरलेली असतानाही विक्रम यांनी सकाळी सर्वप्रथम मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

लग्नाची तयारी, पाहुण्यांची लगबग आणि वेळेची घाई असतानाही आधी मतदान, मग लग्न या भूमिकेतून त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांच्या समवेत कुटुंबीय व मित्रमंडळीही मतदानासाठी उपस्थित होती. मतदान केल्यानंतर थेट लग्नस्थळासाठी ते पुण्याकडे रवाना झाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर तेजीत, तुर आणि कापसाला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

मतदान केंद्रावर पारंपरिक पोशाखातील नवरदेव पाहून उपस्थित मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. अनेकांनी त्यांचे कौतुक करत छायाचित्रेही काढली. मतदान हा लोकशाहीचा उत्सव असून प्रत्येकाने त्यात सहभागी व्हावे, असा संदेश त्यांच्या कृतीतून दिला गेल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दुपारी पुण्यात लग्न, तरी मतदानासाठी नवरदेव कराडमध्येच, व्होटींग करताच लग्नाकडे धाव
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल