रिठद आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी तब्बल साडे चार कोटी रुपये खर्च करण्यात आले असून या इमारतीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याऐवजी मासोळ्या विक्री होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
वाशिमच्या रिठद परिसरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी परिसरात साडे चार कोटी रुपये खर्चून इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे काम मागील एक वर्षा अगोदर होऊनही इमारत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना हस्तांतरित करण्यात आली. तरी अद्याप या इमारतीत आरोग्य सेवा सुरू करण्यात आली नाही.
advertisement
त्यानंतरही या आरोग्य केंद्राची सुरक्षा करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराकडे असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र या आरोग्य केंद्राची सुरक्षा करणारा सुरक्षा रक्षकच या आरोग्य केंद्रातूनच मासोळ्या विक्री करत असल्याचा प्रकार आज रिठद च्या नागरिकांनी उघडकीस आणला आहे.
रिठदच्या आरोग्य केंद्रात मासोळ्या विक्रीचा प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी या केंद्राच्या इमारतीची पाहणी करत दोषींवर कारवाई करणार असून हे आयुष्यमान आरोग्य केंद्र लवकरात लवकर नियमित सुरू व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविणार आहोत.