TRENDING:

कार्यालयावर कांदे भिरकावले, दिवसभर राडा, अखेरीस सरकारची माघार; बच्चू कडूंनी आंदोलन घेतलं मागे

Last Updated:

शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रश्न घेऊन प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अगोदर ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
येवला :  कांदा, मका यांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचं येवल्यात सुरू असलेलं आंदोलन अखेरीस मागे घेण्यात आलं आहे. पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या आश्वासनानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं असल्याची घोषणा केली.
News18
News18
advertisement

शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रश्न घेऊन प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अगोदर ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर गळ्यात कांद्याच्या माळा घालून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा प्रांत कार्यालयावर पोहोचल्यानंतर बच्चू कडू आणि गणेश निंबाळकर आक्रमक भूमिका घेऊन प्रांत कार्यलयावर कांदे भिरकावले होते.

एवढंच नाहीतर बच्चू कडू पाठोपाठ संतप्त शेतकऱ्यांनी देखील कांदे भिरकविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी प्रांत कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन सुरू केलं.  वातावरण चिघळू नये म्हणून प्रांतअधिकारी आणि पोलीस उपाधीक्षक यांनी बच्चू कडू, गणेश निंबाळकर यांना चर्चेसाठी बोलवलं. अधिकाऱ्यांसोबत तीन तास चर्चा करण्यात आली.

advertisement

आता मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे दर घसरलेलेचं, लिंबू खातंय चांगलाच भाव, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

कांदा, मका यांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर योग्य तोडगा निघाला पाहिजे, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली.  पणनमंत्री जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक आयोजित करून देण्याचं आश्वासन दिलं.  त्यामुळे आंदोलन मागे घेण्यास बच्चू कडू यांनी तयारी दर्शवली.  त्यानंतर पणनमंत्री जयकुमार रावल यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं. आता पुढील बैठक ही मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणार आहे. या बैठकीमध्ये बच्चू कडू काय मागण्या मांडणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कार्यालयावर कांदे भिरकावले, दिवसभर राडा, अखेरीस सरकारची माघार; बच्चू कडूंनी आंदोलन घेतलं मागे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल