TRENDING:

संभाजीनगरात घृणेश्वराचं दर्शन घेताच महिलेचा मृत्यू, 12 ज्योतिर्लिंग यात्रा राहिली अर्धवट

Last Updated:

बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी निघालेल्या एका भाविक महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी निघालेल्या एका भाविक महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसरातच तिचा मृत्यू झाला आहे. मोरम्मा मलकाजप्पा पट्टन शेट्टी (वय ५८) असं मृत महिलेचं नाव असून, त्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील रहिवासी होत्या. ही घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
News18
News18
advertisement

सहा ज्योतिर्लिंगांचे दर्शन झाले, पण...

मोरम्मा पट्टन शेट्टी या आपल्या कुटुंबासह आणि २७ जणांच्या समूहासोबत ११ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या इंडी तालुक्यातून ज्योतिर्लिंग यात्रेसाठी निघाल्या होत्या. त्यांनी आतापर्यंत औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, काशी विश्वेश्वर, उज्जैनचे महाकालेश्वर, ओंकारेश्वर आणि वेरूळचे घृष्णेश्वर अशा सहा ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केलं होतं. उर्वरित सहा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी त्या पुढे जाणार होत्या, मात्र काळाने त्यांच्यावर झडप घातली.

advertisement

नेमकी घटना काय?

शनिवारी रात्री घृष्णेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन मोरम्मा या मंदिर परिसरातील पार्किंगकडे परतत होत्या. त्याचवेळी त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि त्या जागीच कोसळल्या. सोबत असलेल्या भाविकांनी त्यांना तातडीने खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केलं. रविवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

advertisement

मुलगा सैन्यदलात कर्नल

मृत मोरम्मा यांचा मुलगा भारतीय सैन्यदलात कर्नल पदावर श्रीनगर येथे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यात्रेतील सर्व भाविक कर्नाटकचे असल्याने त्यांना मराठी भाषा समजत नव्हती, अशा कठीण प्रसंगी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब फुलारे यांनी पुढाकार घेऊन कायदेशीर प्रक्रिया आणि मृतदेह मूळ गावी पाठवण्यासाठी मोठी मदत केली.

advertisement

२६ भाविकांनी यात्रा सोडली अर्धवट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उचलली लेखणी, पुण्यात 'हे' पहिल्यांदाच घडतंय, Video
सर्व पहा

या घटनेमुळे संपूर्ण समूहावर शोककळा पसरली आहे. आपल्या सोबत असलेल्या सहकारी महिलेचा असा अचानक मृत्यू झाल्याने उर्वरित २६ भाविकांनी आपली पुढील यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. उर्वरित सहा ज्योतिर्लिंगांचे दर्शन न घेता सर्वजण कर्नाटककडे परतले. खुलताबाद पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजीनगरात घृणेश्वराचं दर्शन घेताच महिलेचा मृत्यू, 12 ज्योतिर्लिंग यात्रा राहिली अर्धवट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल