TRENDING:

गावातील घरकुल लाभार्थी यादीत तुमचं नाव आलं की नाही? घरबसल्या कसं चेक करायचं?

Last Updated:

Gharkul Yojana : गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांसाठी घरकुल आवास योजना प्रभावीपणे राबवली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांसाठी घरकुल आवास योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत अनेक कुटुंबांना स्वतःचे पक्के घर उभारण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. मात्र, “घरकुल योजनेच्या यादीत आपले नाव आहे की नाही?” हा प्रश्न अजूनही अनेक लाभार्थ्यांच्या मनात आहे. विशेष म्हणजे, ही माहिती आता अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाइन तपासता येते.
Gharkul Yojana
Gharkul Yojana
advertisement

घरकुल योजना म्हणजे काय?

घरकुल योजना म्हणजे केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण). या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील गरजू, गरीब आणि बेघर कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देणे हा आहे. घरकुल मंजुरीनंतर टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

घरकुल यादी तपासणे का महत्त्वाचे?

घरकुल यादीत नाव असल्यासच लाभार्थ्याला योजनेचा प्रत्यक्ष फायदा मिळतो. यादीतून कोणाला घर मंजूर झाले आहे, कोणत्या टप्प्यावर काम सुरू आहे, निधी किती मिळाला आहे, याची सविस्तर माहिती उपलब्ध होते. त्यामुळे अर्ज केल्यानंतर नियमितपणे यादी तपासणे गरजेचे आहे.

advertisement

घरकुल यादी ऑनलाइन कशी तपासायची?

घरकुल यादी तपासण्यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. मोबाईल किंवा संगणकाच्या मदतीने खालील पद्धतीने तुम्ही ही माहिती पाहू शकता.

स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

सर्वप्रथम गुगलवर pmayg.nic.in ही वेबसाइट सर्च करा. वेबसाइट उघडल्यानंतर “प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण” असे मुख्य पेज दिसेल. यामध्ये खाली दिलेल्या पर्यायांमधून AwaasSoft या पर्यायावर क्लिक करा. पुढील पानावर Reports या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Social Audit Reports हा पर्याय निवडा. येथे Beneficiary Details for Verification या लिंकवर क्लिक करा.यानंतर MIS Report नावाची नवीन विंडो उघडेल.

advertisement

या ठिकाणी तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, गाव, वर्ष आणि योजनेचे नाव निवडा. शेवटी दिलेला कॅप्चा कोड भरून Submit बटणावर क्लिक करा.

यादीत काय माहिती मिळते?

वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या गावातील घरकुल योजनेच्या सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी स्क्रीनवर दिसेल. जसे की,

कोणाला घर मंजूर झाले आहे?

घरकुल कोणत्या टप्प्यावर आहे?

advertisement

पहिला, दुसरा किंवा अंतिम हप्ता मिळाला आहे का?

घर पूर्ण झाले आहे की काम सुरू आहे?

अशी सविस्तर माहिती या यादीत उपलब्ध असते.

अडचण आल्यास काय करावे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मालामाल करणारी रताळी शेती, 5 एकरांत 750 क्विंटल उत्पादन, शेतकऱ्याला 8 लाख नफा
सर्व पहा

ऑनलाइन यादी पाहताना अडचण आल्यास ग्रामसेवक, पंचायत समिती कार्यालय किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी संपर्क साधता येतो. तसेच, वेबसाइटवरील हेल्पडेस्क पर्यायाचाही उपयोग करता येतो.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गावातील घरकुल लाभार्थी यादीत तुमचं नाव आलं की नाही? घरबसल्या कसं चेक करायचं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल