रतन टाटांची वसीयत आणि जिमी टाटा यांना मिळालेला वारसा
रतन टाटा यांनी ३८०० कोटी रुपयांची संपत्ती सुव्यवस्थितपणे वाटून दिली आहे. कर्मचाऱ्यांपासून शेजाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचा विचार करण्यात आला आहे. पण सर्वाधिक चर्चेत असलेला भाग म्हणजे त्यांचे बंधू जिमी टाटा यांना मिळालेली मालमत्ता.
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, मुंबईतील जुहू येथील आलिशान बंगला आणि मौल्यवान दागिने जिमी टाटा यांना मिळाले आहेत. हा बंगला त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाल्याचे सांगितले जाते, मात्र आता तो अधिकृतपणे त्यांच्या नावावर झाला आहे.
advertisement
ना मोबाईल, ना टीव्ही – जिमी टाटांची साधी जीवनशैली
टाटा घराण्यात जन्म असूनही जिमी टाटा यांनी सर्वसामान्य, अगदी साधी जीवनशैली निवडली आहे. ते मुंबईच्या कोलाबा परिसरातील एका 2 BHK फ्लॅटमध्ये राहत असून त्यांच्याकडे ना सुरक्षारक्षक, ना कोणताही दिखावा. विशेष म्हणजे जिमी टाटा मोबाईल फोन किंवा टीव्हीचा वापर करत नाहीत! त्यांच्यासाठी जगाच्या घडामोडी समजून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वृत्तपत्रं.
खऱ्या टाटा परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे जिमी टाटा
उद्योगपती हर्ष गोयनका यांनी एकदा ट्वीट करत जिमी टाटा यांचा उल्लेख केला होता. त्यांनी सांगितलं होतं की, जिमी हे उत्कृष्ट स्क्वॅश खेळाडू आहेत आणि त्यांना हरवणं कठीण आहे. त्यांच्या लो-प्रोफाइल जीवनशैलीबद्दलही त्यांनी कौतुकाने लिहिलं होतं.
जिमी टाटा यांनी रतन टाटा यांच्यासारखंच लग्न न करण्याचा निर्णय घेतला. सध्या ते टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत आणि टाटा सन्स, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि इतर अनेक कंपन्यांमध्ये मोठे शेअरहोल्डर आहेत.
साधेपणात असलेली खरी श्रीमंती!
टाटा घराण्याचा वारसा असूनही जिमी टाटा कधीही प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत. त्यांच्या साधेपणातच त्यांची खरी श्रीमंती आहे. मोठ्या औद्योगिक घराण्यात जन्म घेतलेल्या व्यक्तीला प्रसिद्धी हवीच असते, हा समज जिमी टाटांनी खोटा ठरवला. रतन टाटांच्या वसीयतीतून त्यांच्या साधेपणाचा योग्य सन्मान करण्यात आला आहे. ते फक्त टाटा घराण्याचे सदस्य नाहीत, तर त्या परंपरेचं एक मूळ स्वरूप आहेत – साधेपणा, निष्ठा आणि जबाबदारी!