TRENDING:

Success Story : सोशल मीडियावरून सुचली कल्पना, बनवला भन्नाट मोबाईल बेल्ट, वर्षाला आता 7 लाख रुपयांची कमाई

Last Updated:

हीच अडचण लक्षात घेऊन आकांक्षाने असा बेल्ट तयार केला ज्यात मोबाईल सुरक्षितपणे ठेवता येतो आणि दिसायलाही आकर्षक असतो.

advertisement
मुंबई: मुंबई उपनगरातील वसईची तरुणी आकांक्षा राऊत आज सोशल मीडियावर आणि महिला उद्योजकांच्या जगतात चर्चेचा विषय ठरली आहे. तिचं भन्नाट आणि उपयुक्त असं मोबाईल बेल्ट डिझाईन कारण आहे. साडी किंवा ड्रेस घातल्यावर अनेक मुलींना मोबाईल किंवा छोट्या वस्तू कुठे ठेवायच्या, हा नेहमीचा प्रश्न असतो. मोठी बॅग घेऊन फिरणं त्रासदायक ठरतं. हीच अडचण लक्षात घेऊन आकांक्षाने असा बेल्ट तयार केला ज्यात मोबाईल सुरक्षितपणे ठेवता येतो आणि दिसायलाही आकर्षक असतो.
advertisement

सोशल मीडियावरून सुचलेली कल्पना

क्राफ्टचे व्हिडिओ बघताना आकांक्षाला मोबाईल बेल्टची कल्पना सुचली. त्यानंतर तिने डिझायनर म्हणून चालू असलेली नोकरी सोडून पूर्ण वेळ हा व्यवसाय सुरू केला. तिचा हा बेल्ट पार्टी, लग्नसमारंभ किंवा कोणत्याही कार्यक्रमात परिधान करता येतो आणि तो दिसायलाही फॅशनेबल आहे.

सोलापुरातील बँक कर्मचाऱ्याचा अनोखा छंद, 150 हून अधिक नाटकांची तिकीट केली संग्रह, Video

advertisement

डिझाईन आणि गुणवत्ता

हा मोबाईल बेल्ट पूर्णपणे हाय-क्वालिटी मटेरियल वापरून तयार केला जातो. त्यात मोत्यांचे, कापडी आणि आकर्षक डिझाईन्सचे पर्याय उपलब्ध आहेत. किंमत केवळ 699 रुपयांपासून असून तो मोबाईल कव्हरला अटॅच करून सुरक्षितपणे वापरता येतो. या बेल्टबरोबर ती वेगवेगळ्या बॅग देखील स्वतः शिवते.

व्यवसायात यश आणि प्रसिद्धी

आकांक्षाने सुरुवातीला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि विविध एक्झिबिशनमध्ये आपल्या उत्पादनाची ओळख करून दिली. तिच्या या कल्पक उत्पादनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून अनेक मराठी सेलिब्रिटी सुद्धा तिचा हा मोबाईल बेल्ट वापरतात.

advertisement

आकांक्षाला हा व्यवसाय सुरू करून 2 वर्षं झाली आहेत. या व्यवसायातून ती वर्षाला 5 ते 7 लाख रुपयांची कमाई करते.

मराठी बातम्या/मनी/
Success Story : सोशल मीडियावरून सुचली कल्पना, बनवला भन्नाट मोबाईल बेल्ट, वर्षाला आता 7 लाख रुपयांची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल