Gold Silver Price: वर्ष संपायला 48 तास बाकी अन् धडाम्! 21000 रुपयांनी पडली चांदी, सोन्याचे दर काय?

Last Updated:
MCX वर चांदीच्या दरात २१,००० रुपयांची घसरण आणि लगेच ६,००० रुपयांची उसळी, सोनं ५,००० रुपयांनी स्वस्त. IBJA नुसार वर्षभरात सोन्या-चांदीने विक्रमी वाढ नोंदवली.
1/7
वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी अवघे ४८ तास उरले असतानाच सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रॉकेटच्या वेगाने वाढणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरांना अचानक ब्रेक लागला असून, गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे.

advertisement
2/7
 सोमवारी चांदीच्या दरात तब्बल २१,००० रुपयांची ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली, तर सोन्याच्या किमतीतही ५,००० रुपयांची कपात झाली आहे. मात्र, मंगळवारी सकाळी बाजार उघडताच चांदीने पुन्हा एकदा उसळी घेतल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

3/7
सोमवारी चांदीच्या दराने सर्वांनाच चकित केले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीचा भाव सकाळी २.३९ लाखांवर उघडला होता आणि पाहता पाहता तो २.५४ लाख या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. मात्र, दुपारनंतर चित्र अचानक बदलले. चांदीचे दर ८ टक्क्यांनी म्हणजेच तब्बल २१,००० रुपयांनी कोसळले आणि भाव २.३३ लाखांपर्यंत खाली आले.

4/7
विशेष म्हणजे, ही घसरण जास्त काळ टिकली नाही. आज (मंगळवारी) सकाळी बाजार उघडताच चांदीच्या दरात पुन्हा ६,००० रुपयांची वाढ दिसून आली असून, सध्या चांदी २ लाख ३७ हजार रुपये प्रति किलोच्या आसपास व्यवहार करत आहे.

5/7
सोन्याच्या किमतीतही मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) नुसार, सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३८,१६१ रुपयांवर उघडला होता. मात्र, दिवसअखेर त्यात १,१७५ रुपयांची घट होऊन तो १,३६,७८१ रुपयांवर बंद झाला. एकूणच, उच्चांकी स्तरावरून सोनं सुमारे ५,००० रुपयांनी स्वस्त झाल्याने दागिने खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

6/7
संपूर्ण वर्षाचा आढावा घेतला तर सोन्या-चांदीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या एका वर्षात सोन्याच्या किमतीत ६०,६१९ रुपयांची, तर चांदीच्या किमतीत तब्बल १,४९,४२३ रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक घडामोडी आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे मौल्यवान धातूंच्या किमतींनी या वर्षी नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

7/7
बाजार तज्ज्ञांच्या मते, वर्षाच्या शेवटी नफा वसुलीमुळे ही घसरण पाहायला मिळत आहे. मात्र, मागणी कायम असल्याने दर पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने ग्राहकांनी अशा पडझडीचा फायदा घेऊन खरेदी करावी की आणखी घसरणीची वाट पाहावी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रावर नव्या वर्षात मोठं संकट, 5 दिवस हवामानात मोठे बदल, हवामान विभागाने दिला अलर्ट
महाराष्ट्रावर नव्या वर्षात मोठं संकट, 5 दिवस हवामानात मोठे बदल
  • उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरणार

  • विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काय स्थिती?

  • मध्य महाराष्ट्रात कसं राहील हवामान?

View All
advertisement