हे 4 लाख, 5 आणि हे 14 लाख..,नोटांची बंडलं बॅगेत ठेवली, लाच घेताना पोलिसाच्या VIDEO ने छ.संभाजीनगरमध्ये भूकंप
- Published by:Sachin S
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमधील एक व्हिडिओ खळबळ उडाली आहे. एका पोलीस कर्मचारी 14 लाखांची लाच घेताना व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : राज्याचं कामकाज जिथून पाहिलं जातं त्या मंत्रालयात लाचखोरीचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने तब्बल १४ लाखांची लाच घेत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन तर निरीक्षकाची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. पण, इतकी मोठी रक्कम स्वीकारताना लाचखोरीच्या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील एक व्हिडिओ खळबळ उडाली आहे. एका पोलीस कर्मचारी 14 लाखांची लाच घेताना व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. संभाजीनगरच्या लेणी परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खनवर कारवाई करू नयेत यासाठी एका पोलीस निरिक्षकाने आपल्या रायटरच्या माध्यमातून लाच घेतल्याचा देखील दावा केला जात आहे.
advertisement
व्हिडीओमध्ये काय घडलं?
या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक व्यक्ती 14 लाख रुपये मोजून घेताना दिसत आहे. हे सगळे एका कारमध्ये बसलेले आहे. एका बॅगेमध्ये २ लाख, ३ लाख, ४ लाख, ५ लाख, 7 आणि असे 12 लाख होईपर्यंत अशी मोजलेली बंडलं बॅगेत ठेवली जात आहे. असं करत आधी १३ लाख रुपये बॅगेत ठेवण्यात आली. त्यानंतर गायकवाड नावाच्या व्यक्तीने आणखी १ लाखांची मागणी केली. आम्हाला १५-१५ लाख द्यावे लागतात. आता तुम्ही खिश्यातून कुठे देतात, असं गायकवाड नावाची व्यक्ती व्हिडीओमध्ये म्हणत आहे. "हे पैसे वाटावे लागणार आहे, तुम्ही हे पैसे पोलीस कर्मचाऱ्यांना वाटाना, असं पैसे देणारा या व्हिडीओमध्ये म्हणत आहे.
advertisement
हा व्हिडीओ समोर आल्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. हा व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लाचेची रक्कम घेतली जात असल्याच्या दाव्याने पोलीस दलाला हादरा बसला आहे. तर या सर्व घटनेवर पोलिसांची देखील प्रतिक्रिया आली आहे, व्हिडिओ दिसणाऱ्या पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आला आहे. तसंच ज्या पोलीस निरीक्षकावर आरोप करण्यात आले आहे, त्यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
advertisement
पोलीस कर्मचारी निलंबित
"व्हायरल व्हिडीओ प्रकरणी शहर विभाग एसपी चौकशी करत आहे. या प्रकरणातील चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येईल. प्राथमिक पातळीवर संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. संबंधित पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी अंती पुढील कारवाई केली जाईल", अशी माहिती पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिला आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
अवैध उत्खननावर कारवाई करण्यात येऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्यासाठी 12 लाख रुपये आणि दोन लाख रुपये पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी असा हा व्हिडीओ आहे. हा संपूर्ण प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील बेगमपुरा पोलीस ठाण्यातील आहे बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेणी परिसरात अवैध उत्खनन सुरू होते, त्यावर कारवाई करू नये यासाठी 14 लाखाची लाज घेत असल्याचा दावा या व्हिडिओतून होत आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या गणेश गायकवाड या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे, तर ज्या पोलीस निरीक्षकांवर बारा लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे त्यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे.
Location :
Aurangabad Cantonment,Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 6:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हे 4 लाख, 5 आणि हे 14 लाख..,नोटांची बंडलं बॅगेत ठेवली, लाच घेताना पोलिसाच्या VIDEO ने छ.संभाजीनगरमध्ये भूकंप









