आज सकाळी इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार 99.99% शुद्धतेचं सोने 96,286 रुपये प्रति 10 ग्रॅमने उघडलं आणि दिवस अखेरीस 96,011 रुपयांवर बंद झालं. सोमवारी हेच सोने 95,420 वर उघडलं आणि 95,108 रुपये दराने बंद झालं होतं. म्हणजेच, किंमती थोडी वरखाली होत असल्या तरी अजूनही त्या उच्च पातळीवर आहेत. अक्षय्य तृतीयेमुळे आज हे दर थोडे वाढले असून 97 हजार 998 रुपयांवर दर पोहोचले आहेत. तर GST सह हेच दर 98 हजार 773 रुपये आहेत.
advertisement
स्टॉकग्रोचे संस्थापक आणि CEO अजय लखोटिया यांनी यंदाच्या अक्षय तृतीयेस गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, दागिन्यांऐवजी गोल्ड ETF, गोल्ड म्युच्युअल फंड किंवा डिजिटल गोल्ड यांसारखे पर्याय अधिक फायदेशीर ठरू शकतात. लखोटिया म्हणतात, “दागिने खरेदीत घडणावळ, सुरक्षेची चिंता आणि पुन्हा विक्रीची मर्यादा असते. पण डिजिटल पर्यायांमध्ये हे टाळता येतं. शिवाय थोड्या रकमेपासूनही गुंतवणूक सुरू करता येते.”
सोनं नाही तर चांदीतही करा गुंतवणूक
तांत्रिक उपकरणे, इलेक्ट्रिक वाहनं आणि औद्योगिक वापरात वाढत्या मागणीमुळे चांदीचे दरही झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना एकाच धातूवर लक्ष केंद्रित न करता, सोनं आणि चांदीचं संतुलन राखणं फायदेशीर ठरू शकतं. तसं पाहायला गेलं तर सोन्यापेक्षा चांदी दीर्घकाळासाठी चांगले रिटर्न्स देऊ शकते त्यामुळे चांदीमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं राहील.
अक्षय तृतीयेस परंपरेप्रमाणे थोडे दागिने खरेदी करणं काही चुकीचं नाही. पण मोठ्या रकमेची गुंतवणूक करताना आजच्या बाजारस्थितीचा विचार करणे गरजेचे आहे. दागिने परंपरेसाठी, पण गुंतवणुकीसाठी ETF किंवा डिजिटल फॉर्म, असा संतुलित दृष्टिकोन तुमचं आर्थिक आरोग्य मजबूत करू शकतो. दागिने खरेदी करण्याऐवजी गुंतवणूक करण्याच्या दृष्टीनं विचार केला तर फायद्याचा ठरू शकतो.