नक्की वाद काय होता?
2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करण्यास सुरुवात केली होती. ट्रम्प प्रशासनाने याला विरोध करत भारताला रशियापासून दूर ठेवण्यासाठी भारतीय वस्तूंवर 25 टक्के दंडात्मक आयात कर, टॅरिफ लादला होता. यामुळे अमेरिकेत भारतीय वस्तू महाग झाल्या होत्या आणि निर्यातीवर मोठा परिणाम झाला.
advertisement
स्कॉट बेसेंट काय म्हणाले?
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना बेसेंट म्हणाले, "भारतावर लावलेला २५ टक्के टॅरिफ अत्यंत यशस्वी ठरला आहे. यामुळे भारतीय रिफायनरीजनी रशियाकडून केल्या जाणाऱ्या तेलाच्या खरेदीत मोठी घट झाली आहे. हा टॅरिफ ज्या उद्देशाने लावला होता, तो आता पूर्ण झाला असून, आता तो हटवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो."
भारतासाठी हे महत्त्वाचे का?
हा टॅरिफ हटल्यास भारतीय औषधे, कापड, स्टील आणि इंजिनिअरिंग वस्तू अमेरिकन बाजारात पुन्हा स्वस्त होतील. भारतासाठी अमेरिका हा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. टॅरिफ हटल्याने भारतीय कंपन्यांना मोठा नफा मिळेल. हे भारताच्या 'इंडिया फर्स्ट' ऊर्जा धोरणाचा विजय मानला जात आहे, कारण भारताने दबावापुढे न झुकता रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली होती आणि आता अमेरिकाच मवाळ भूमिका घेत आहे.
भारतावर काय परिणाम होणार?
जर हा 25% टॅरिफ हटला, तर भारताची अमेरिकेतील निर्यात पुन्हा गतीने वाढेल. विशेषतः आयटी, ऑटो पार्ट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपन्यांना याचा मोठा फायदा होईल. तसेच, यामुळे भारत-अमेरिका व्यापार कराराचा मार्ग अधिक सुकर होईल, ज्याची प्रतीक्षा दोन्ही देश दीर्घकाळापासून करत आहेत.
