कुंबेफळ येथे सन 2020 मध्ये अनिल शेळके यांनी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी बारामती येथे प्रशिक्षण घेतले. बेंगलोर येथून 10 गाई खरेदी केल्या आणि चार-पाच महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोना या आजाराचा प्रसार होऊ लागला. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन केले होते. लॉकडाऊनमुळे सर्व मार्केट ठप्प पडले, या गाईंच्या माध्यमातून निघणारे दूध देखील विक्री होईना गेले ते वाया जात होते. दुधाची विक्री झाली नाही तर ते फेकून द्यावे लागत होते मात्र विचाराला दूध फेकून देण्यापेक्षा यावर काही प्रयोग केला तर फायद्याचे ठरेल, तसेच भरपूर वेळ देखील होता.
advertisement
Success Story : छोट्या मोमोज स्टॉलपासून केली सुरूवात, आज 2 फूड आउटलेट, नितीनची महिन्याला 3 लाख कमाई
फेकले जाणाऱ्या दुधावर अभ्यास केला त्या दुधाला उपयोगात कसे आणावे यासाठी मोबाईलवर युट्युब सारख्या माध्यमातून ऑनलाइन माहिती घेतली. तूप, दही, श्रीखंड आणि लस्सी यासह विविध पदार्थ कसे बनवावेत हे प्रत्यक्षात अनुभवले आणि तेव्हापासून सर्वत्र सर्व पदार्थांची मागणी वाढत गेली. ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे एक-एक करून पदार्थ आम्ही बनवत राहिलो, अशी प्रतिक्रिया देखील शेळके यांनी दिली.
नवीन व्यवसायाची सुरुवात कशी करावी?
नवीन व्यवसायिकांना दुग्ध व्यवसायामध्ये आपले करिअर आणि भविष्य घडवायचे असल्यास सुरुवातीच्या काळामध्ये 10 गाई खरेदी कराव्यात. यामध्ये ओपन गोठा करून मोर घास केले चांगले नियोजन केले तर यासाठी मेहनत कमी लागते. पारंपारिक पद्धतीने त्यांचा सांभाळ केल्यास जास्त खर्च होतो.