राष्ट्रीय आणि स्थानिक सुट्ट्यांमुळे बँका बंद राहणार आहेत. सुट्टीच्या दिवसांमध्ये ऑनलाइन सेवा सुरू राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकता. या महिन्यात अनेक राज्यांमध्ये महात्मा गांधी जयंती, दसरा, दुर्गापूजा आणि दिवाळी या महत्त्वाच्या सणांमध्ये बँका बंद राहतील.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते, ज्यात सर्व सण, स्थानिक आणि राष्ट्रीय वर्धापनदिन आणि शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी काय आहे जाणून घेऊया.
advertisement
1 ऑक्टोबर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका
2 ऑक्टोबर : महात्मा गांधी जयंती / महालया अमावस्या
3 ऑक्टोबर : शारदीय नवरात्री आणि महाराजा अग्रसेन जयंती
6 ऑक्टोबर: साप्ताहिक सुट्टी (रविवार)
10 ऑक्टोबर: महा सप्तमी / दुर्गा पूजा / दसरा
11 ऑक्टोबर: दुर्गा अष्टमी / आयुधा पूजा / महानवमी
12 ऑक्टोबर : विजयादशमी / दुसरा शनिवार
13 ऑक्टोबर: साप्ताहिक सुट्टी (रविवार)
14 ऑक्टोबर: दुर्गा पूजा (गंगटोक)
16 ऑक्टोबर: लक्ष्मी पूजा (अगरताळा, कोलकाता)
17 ऑक्टोबर: महर्षि वाल्मिकी जयंती/कटी बिहू
20 ऑक्टोबर: साप्ताहिक सुट्टी (रविवार)
26 ऑक्टोबर: जम्मू आणि काश्मीरमध्ये अधिग्रहण दिवस/चौथा शनिवार
27 ऑक्टोबर: साप्ताहिक सुट्टी (रविवार)
31 ऑक्टोबर: दिवाळी (दीपावली) / काली पूजा / सरदार वल्लभभाई पटेल जयंती / नरक चतुर्दशी