Numerology: रखडलेली पदोन्नती, महत्त्वाचे काम होणार! मंगळवार 3 मूलांकासाठी लकी ठरणार, अर्थलाभ
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Numerology 09 September 2025: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 09 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज कमाईतील काही रक्कम दान करणं फायद्याचं ठरेल. मूड चांगला राहील पण, आरोग्याची काळजी घ्या. ताप येण्याची शक्यता आहे. सुखसुविधांसाठी आज खरेदी करू शकता. त्यासाठी सध्याची वेळ अनुकूल आहे. जोडीदाराशी नातं उत्तम राहील. मंगळवार छान आहे.
Lucky Colour : Crimson
Lucky Number : 6
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
कामात आज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फायदा होईल. डोकेदुखीची समस्या उद्भवली तर विश्रांती घ्या. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते. व्यवसायाच्या दृष्टिनं आज चांगला प्रस्ताव येईल, त्याचा लाभ घ्या. जोडीदाराशी नातं उत्तम राहील. घरात आनंद.
Lucky Colour : Light Red
Lucky Number : 22
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
आज मंगळवारी कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. कुटुंबात मदत करा फायद्याचं ठरेल. गाडी जपून चालवणं गरजेचं अन्यथा नुकसान होऊ शकते. ओळखीच्या व्यक्तींकडून फायदा होईल. प्रेमाबाबत आज एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. त्यासाठी अनुकूल वेळ आहे. पुढाकार घेऊ शकता.
Lucky Colour : Parrot Green
Lucky Number : 5
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
दिवस लकी आहे, आज तुम्ही खूप काळापासून प्रलंबित असलेला खटला जिंकू शकता. घरासाठी काही वस्तू खरेदी कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच आनंदाचा असेल. तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहील. प्रेमाच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीशी नातं जोडण्यापूर्वी विचार करा.
Lucky Colour : Forest
Lucky Number : 17
advertisement
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
जास्त ताण घेऊ नका, कुटुंबात कोणाशी नातं ताणलं जाऊ शकतं, अशा परिस्थितीत तडजोड करणे फायद्याचं ठरेल. तुम्हाला हवे असलेले ज्ञान मिळेल. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी ते तुमचं नुकसान करू शकणार नाहीत. जुन्या वस्तूंच्या संबंधित तुमचा व्यवसाय असल्यास चांगला नफा मिळेल. प्रेमाबाबत दिवस चांगला आहे.
advertisement
Lucky Colour : Navy Blue
Lucky Number : 15
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कामातून सार्वजनिक कार्यक्रमासाठी वेळ काढावा लागेल. सार्वजनिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं फायद्याचं ठरेल. तुमचे विरोधक तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील, सावध राहा. तुमचे पैसे योग्य कामासाठी खर्च होत आहेत का पहा. आज विश्रांतीला प्राधान्य द्या. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. जोडीदाराशी नातं छान राहील.
advertisement
Lucky Colour : Lemon
Lucky Number : 9
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कामात काळजी घ्यावी लागले, आज वरिष्ठांकडून तुमच्या कामात अडचणी येऊ शकतात. घरासाठी एखादी वस्तू खरेदी करू शकता. आरोग्याची किरकोळ समस्या जाणवेल, काळजी घ्या. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते. जोडीदाराशी आज वाद होण्याची शक्यता आहे, गोष्टी वाढवू नका, सावध राहा, अन्यथा वाद विकोपाला जाऊ शकतो.
Lucky Colour : Light Blue
Lucky Number : 22
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
अनेक कामांचा एकत्र गोंधळ होण्याची परिस्थिती असेल, आज अडचणीच्या काळात मित्र सहकार्य करतील. कुटुंबातील लोकांना कामात मदत करा, फायद्याचं ठरेल. तुमच्या जवळची व्यक्तीच तुमच्या करिअरमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करेल, सावध राहा. व्यवसायाशी संबंधित समस्या निर्माण झाल्यानं आज तुम्ही तणावात राहाल. प्रेमासाठी दिवस उत्तम आहे.
Lucky Colour : Purple
Lucky Number : 4
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कामात कोणाची मदत मिळणार नाही, उगीच आशा लावून बसू नका. मुलांच्या शाळेतून काही चांगली बातमी येईल. आज कामांमध्ये तुमचा आत्मविश्वास दिसून येईल. नोकरदारांना पदोन्नती किंवा व्यवसायात प्रगती होऊ शकते. जोडीदाराशी किरकोळ वाद होऊ शकतो, पण त्यानंतर प्रेमाचं नातं जास्तच घट्ट होईल.
Lucky Colour : Sea Green
Lucky Number : 15
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 6:34 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: रखडलेली पदोन्नती, महत्त्वाचे काम होणार! मंगळवार 3 मूलांकासाठी लकी ठरणार, अर्थलाभ