चंद्रग्रहण झालं! आता या 4 राशींना येणार सोन्याचे दिवस, धनसंपत्तीत वाढ होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Chandra Grahan 2025 : वैदिक ज्योतिषानुसार रविवारी (७ सप्टेंबर) ला वर्षातील अखेरचं चंद्रग्रहण पाहायला मिळालं. भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी सुरू झालेलं हे ग्रहण रात्री १ वाजून २६ मिनिटांनी संपलं.
वैदिक ज्योतिषानुसार रविवारी (७ सप्टेंबर) ला वर्षातील अखेरचं चंद्रग्रहण पाहायला मिळालं. भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी सुरू झालेलं हे ग्रहण रात्री १ वाजून २६ मिनिटांनी संपलं. जवळपास ३ तास २८ मिनिटं चाललेल्या या खगोलीय घटनेचा प्रभाव भारतातही दिसून आल्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, या ग्रहणानंतर काही राशींना मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदलांचा अनुभव येणार आहे. चला जाणून घेऊ या कोणत्या राशींना याचा जास्त फायदा होईल.
advertisement
<strong>मेष रास - </strong> मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभदायी ठरणार आहे. आतापर्यंत रखडलेली कामं गती पकडतील आणि मार्गातील अडथळे दूर होतील. करिअरमध्ये प्रगतीची नवी दालने उघडतील. धनप्राप्तीची संधी वाढेल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. मानसिक तणाव कमी होईल व दीर्घकालीन आजारांपासूनही सुटका होण्याची शक्यता आहे.
advertisement
<strong>वृषभ रास - </strong> वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात चंद्रग्रहणानंतर सकारात्मकता वाढेल. सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. लक्ष्मीमातेचा विशेष आशीर्वाद लाभल्यामुळे आर्थिक बाजू भक्कम होईल. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळेल तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरीत असणाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळू शकते.
advertisement
advertisement
<strong>धनु रास - </strong> धनु राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहणानंतरचा काळ अत्यंत भाग्यशाली ठरेल. नियोजित कामे योग्य वेळेत पूर्ण होतील. करिअरमध्ये नव्या संधी उपलब्ध होतील ज्यांचा योग्य वापर करणं महत्त्वाचं आहे. आरोग्याच्या बाबतीतही हा काळ स्थिर व सकारात्मक राहील. आत्मविश्वास वाढेल आणि तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल.


