Pune Traffic Routes : पुणेकरांनो लक्ष द्या! पैगंबर जयंती मिरवणुकीनिमित्त वाहतूकीत आज असा आहे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Last Updated:

Pune City Traffic Diversions : पुण्यात पैगंबर जयंती मिरवणुकीनिमित्त अनेक मार्गांवर वाहतूक बंद करण्यात आली असून वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गांची सोय करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की त्यांनी दिलेल्या मार्गांचा वापर करून वाहतूक कोंडी टाळावी.

News18
News18
पुणे : पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) सोमवारी (दि. 8)अर्थात आज पारंपरिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीदरम्यान लष्कर परिसरासह पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत काही बदल लागू होणार आहेत. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून, वाहनचालकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
मिरवणुकीदरम्यान वापरता येणारे पर्यायी मार्ग
या मिरवणुकीचा प्रारंभ नाना पेठेतील मनुशा मशिद येथून होणार असून, पारंपरिक मार्गाने मिरवणूक पुढे सरकणार आहे. संत कबीर चौक, एडी कॅम्प चौक, भारत चित्रपटगृह, पद्मजी पोलिस चौकी, निशांत चित्रपटगृह, भगवानदास चाळ, चुडामण तालीम चौक, मुक्तीफौज चौक, कुरेशी मशीद, जान महंमद रस्ता, बाबाजान चौक, चारबावडी चौक, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, सेंट्रल स्ट्रीट, भोपळे चौक, गांव कसाब मशीद, पुलगेट चौक, महात्मा गांधी रस्ता, महंमद रफी चौक, कोहिनूर चौक, महावीर चौक, सेंट्रल स्ट्रीट पोलिस चौकी, सरबतावाला चौक, क्वार्टर गेट चौक, नाना चावडी चौक अशा महत्त्वाच्या मार्गांवरून ही मिरवणूक मार्गक्रमण करणार आहे.
advertisement
त्यानंतर मिरवणूक अल्पना चित्रपटगृह, हमजेखान चौक, महाराणा प्रतापसिंह चौक, गोविंद हलवाई चौक, सुभानशहा दर्गा चौक या ठिकाणांवरून पुढे जात शुक्रवार पेठेतील सिटी जामा मशिद परिसरात सांगता होणार आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी मोठी तयारी केली असून, मिरवणुकीदरम्यान संबंधित रस्त्यांवर वाहनतळ करण्यास सक्त मनाई केली आहे. मिरवणूक निघाल्यानंतर तत्काळ मागील रस्ते वाहतुकीसाठी खुले केले जातील. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण मिरवणूक मार्गावर वाहने उभी न करण्याचे आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
advertisement
मिरवणुकीच्या काळात सार्वजनिक वाहतुकीवर देखील परिणाम होणार असून, पीएमपीएमएलच्या काही बस मार्गांमध्ये बदल केले जातील. प्रवाशांनी बसथांब्यावर दिलेल्या सूचनांनुसार प्रवास करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, मिरवणुकीदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच वाहतूक पोलिस, होमगार्ड, स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
advertisement
या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी संयम राखून पर्यायी मार्गांचा वापर करावा, अनावश्यक गर्दी करू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic Routes : पुणेकरांनो लक्ष द्या! पैगंबर जयंती मिरवणुकीनिमित्त वाहतूकीत आज असा आहे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement