Vinod Kambli सचिनपेक्षा श्रेष्ठ ठरला असता? वीरु कांबळी म्हणाला 'क्रिकेटमध्ये माझ्या भावाला जास्त...'

Last Updated:

Vinod Kambli Brother Video : विनोद कांबळी ग्लॅमरच्या हवेत गेला नसता तर सचिनपेक्षा मोठा क्रिकेटपटू होऊ शकला असता का? असा प्रश्न वीरु कांबळीला विचारला गेला.

Vinod Kambli Brother Video
Vinod Kambli Brother Video
Vinod Kambli Brother : टीम इंडियाचा माजी विस्फोटक फलंदाज विनोद कांबळी सध्या आजारपणात दिवस काढतोय. विनोद कांबळी याला बोलायला त्रास होत होता. काही महिन्यांपूर्वी त्याच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचं समोर आलं होतं. अशातच आता विनोद कांबळीच्या भावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जर विनोद कांबळी ग्लॅमरच्या हवेत गेला नसता तर सचिनपेक्षा मोठा क्रिकेटपटू होऊ शकला असता का? असा प्रश्न वीरु कांबळीला विचारला गेला. त्यावर विनोद कांबळीच्या भावाने नम्रपणे उत्तर दिलं.

माझा भाऊ सचिनदादापेक्षा जास्त...

मुलाखतीमध्ये वीरूने उत्तर दिलं. दोन्ही खेळाडूंमध्ये टॅलेन्ट तर सारखंच होतं. आपण असं बोलू शकत नाही की, माझा भाऊ सचिनदादापेक्षा जास्त टॅलेन्टेट होता. विनोद सचिनपेक्षा जास्त टॅलेंटेट नव्हता किंवा सचिनही दादापेक्षा जास्त गुणवान नव्हता. त्यामुळे या दोघांपैका कोण श्रेष्ठ हे कसं सांगता येऊ शकतं, असं वीरु कांबळी याने म्हटलं आहे.
advertisement

सचिन नेहमी फोन करतो

मी कधीही माझ्या भावाच्या तोंडून कधी ऐकलं पण नाही की, मी सचिनपेक्षा वरचढ असलो असतो. सचिन आणि विनोद यांच्यात आधीपासूनच खूप चांगली मैत्री आहे. सचिनने माझ्या भावाला नेहमी पाठिंबा दिला आहे. क्रिकेटमध्ये माझ्या भावाला जास्त काळ खेळता आलं नाही पण सचिन नेहमी फोन करुन विनोदची विचारपूस करतो, अशा खुलासा देखील वीरूने केला आहे.
advertisement

वीरू कांबळी कोण?

दरम्यान, आपल्या मोठ्या भावाला पाहून वीरू कांबळीने देखील लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये हात आजमावला, परंतु विनोद कांबळीने गाठलेल्या उंचीवर पोहोचण्याची संधी त्याला मिळाली नाही. आज मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरात वीरूची स्वतःची क्रिकेट प्रशिक्षण अकादमी आहे, या अकादमीमध्ये वीरू तरुण क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देतो.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vinod Kambli सचिनपेक्षा श्रेष्ठ ठरला असता? वीरु कांबळी म्हणाला 'क्रिकेटमध्ये माझ्या भावाला जास्त...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement