Weather Alert: हलक्यात घेऊ नका! पुणे ते नागपूर 13 जिल्ह्यांवर संकट, शुक्रवारी IMD चा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रावर गेल्या काही दिवसांपासून ‘कोल्ड वेव्ह’चं संकट कायम आहे. आज पुन्हा 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/5
महाराष्ट्रात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीची लाट निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पारा चांगलाच घसरला असून उर्वरित भागात देखील तापमानात मोठी घट झालीये. आज 12 डिसेंबरला पुन्हा ‘कोल्ड वेव्ह’चं संकट कायम आहे. नाशिक ते नागपूर राज्यातील 13 जिल्ह्यांना पुन्हा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.

advertisement
2/5
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर पारा घसरला आहे. मुंबईत किमान तापमान 17-19 अंशांपर्यंत खाली आले असून इतर ठिकाणी त्यात आणखी घट झाली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे समुद्रकिनारी भागात थंडीचा कडाका अधिक असल्याचे दिसते. आज दिवसा तापमान साधारण 30–31°C पर्यंत जाईल, मात्र हवा कोरडी असल्याने दुपारनंतरही उकाडा जाणवणार नाही आणि संध्याकाळी पुन्हा गारवा वाढेल.

3/5
पुणे जिल्ह्यात आजही कडाक्याची थंडी कायम आहे. शहरातील तापमान दिल्लीपेक्षा कमी झालं आहे. किमान तापमान 8–9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. हवामान विभागाने पुण्यासाठी आज पुन्हा यलो अलर्ट दिला आहे. मुळशी, भोर, लोणावळा, जुन्नरसारख्या घाटमाथ्याच्या भागांत सकाळी दवबिंदू कमी झाल्यामुळे गारठा आणखी तीव्र जाणवतो आहे. दुपारचे तापमान 27–29°C च्या दरम्यान स्थिर राहील.

4/5
छत्रपती संभाजीनगरसह मराठाड्यातील जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये हाडं गोठवणारी थंडी जाणवत आहे. तापमान 10 अशांपर्यंत खाली आलं असून सोलापुरात देखील हीच स्थिती आहे. हवेत दिवसभर गारठा जाणवत असल्याने नागरिक हैराण आहेत. या ठिकाणी दिवसाचे तापमान स्थिर असले तरी गारठा अजून वाढण्याची शक्यता आहे.

5/5
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील शीतलहरींचं संकट जाणवत आहे. नाशिकसह जळगाव आणि अहिल्यानगरला आज यलो अलर्ट आहे. तर विदर्भातील नागपूरसह गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांत दातखिळी बसवणारी थंडी जाणवेल. पुढील 24 तासांसाठी या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. तसेच थंडीचा कडाका पुढील काही दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.

BJP Eknath Shinde : मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुतीची घोषणा
मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र
  • मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र

View All
advertisement