Pune Sasoon Hospital Scam: लिपिक महिलेनं सरकारला गंडवलं, ससूनला 4 कोटी 18 लाखांचा चुना, पुण्यातून अटक

Last Updated:

ससून रुग्णालयातील ४ कोटी १८ लाख ६२ हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी पूजा पांडुरंग गराडे यासह २५ जणांवर गुन्हा दाखल, बंडगार्डन पोलिसांकडून तपास सुरू.

News18
News18
पुणे शहराच्या आरोग्य सेवेचे केंद्र असलेल्या ससून रुग्णालयात तब्बल ४ कोटी १८ लाख ६२ हजार रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे गंभीर प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर आता आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी या गुन्ह्यात आणखी एका महिला लिपिकाला अटक केली. या घटनेमुळे आरोग्य विभागातील आर्थिक व्यवहारांवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
काय होता घोटाळा?
आरोपी महिला लिपिक आणि इतर २५ जणांनी मिळून ससून रुग्णालयाच्या बँक खात्यातील मोठी रक्कम हडप केल्याचा आरोप आहे. आरोपींनी रुग्णालयाच्या खात्यातून ४ कोटी १८ लाख ६२ हजार ९४२ रुपये स्वतःच्या आणि इतर खासगी व्यक्तींच्या खात्यावर वळवले. शासकीय रकमेचा अशा प्रकारे अपहार करून त्यांनी शासनाची फसवणूक केली. सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी असलेल्या पैशांचा गैरवापर करण्यात आला. ही गोष्ट धक्कादायक आणि रुग्णालयावरील विश्वास उडेल अशी आहे.
advertisement
लिपिक महिलेला अटक, तीन दिवसांची कोठडी
या गंभीर गुन्ह्यात बंडगार्डन पोलिसांनी ज्या महिलेला अटक केली आहे, आरोपी महिलेचं नाव पूजा पांडुरंग गराडे असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने पूजा गराडेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांना आता अधिक वेळ मिळाला आहे.
केव्हा घडला हा प्रकार?
ससून रुग्णालयातील एका प्रशासकीय अधिकाऱ्याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, हा अपहाराचा प्रकार ३१ जुलै २०२३ ते २४ जानेवारी २०२४ या दरम्यान घडला होता. म्हणजेच, तब्बल सहा महिन्यांहून अधिक काळ हा अपहार सुरू होता. या प्रकरणात एकूण २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय रुग्णालयाच्या व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरकारभार यामुळेच हा घोटाळा इतके दिवस सुरू राहिला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.
advertisement
प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
गरीब आणि गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी असलेल्या निधीची अशा पद्धतीने अफरातफर होणे अत्यंत खेदजनक आहे. या घटनेमुळे केवळ आर्थिक नुकसान झाले नसून, शासकीय रुग्णालयाच्या प्रशासकीय व्यवस्थेतील पारदर्शकतेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास होऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Sasoon Hospital Scam: लिपिक महिलेनं सरकारला गंडवलं, ससूनला 4 कोटी 18 लाखांचा चुना, पुण्यातून अटक
Next Article
advertisement
अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा, पण..., शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

View All
advertisement