तारीख ठरली! नमो शेतकरी योजनेचे 2,000 रु या दिवशी खात्यात जमा केले जाणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच त्यांच्या हाती येणार आहे.
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच त्यांच्या हाती येणार आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हप्ता ९ किंवा १० सप्टेंबर २०२५ रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या हप्त्याचा लाभ राज्यातील ९३ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना मिळणार असून, यासाठी शासनाने तब्बल १,९३२.७२ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
योजनेचा विस्तार
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून प्रति वर्षी ६,००० रुपये अनुदान दिले जाते. राज्य शासनाने त्यात आणखी ६,००० रुपयांची भर घालत ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरू केली. अशा प्रकारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण १२,००० रुपयांचे अनुदान मिळते. आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
advertisement
सातव्या हप्त्याची वैशिष्ट्ये
शासन निर्णयानुसार, सातवा हप्ता हा एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीतील अनुदानाचा आहे. ज्यांची नावे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नोंदलेली आहेत, त्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेतूनही थेट लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थैर्य येण्यास मदत होणार आहे.
कृषिमंत्र्यांचे विधान
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी दिलेला प्रत्येक शब्द पाळला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. अतिवृष्टीमुळे सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हा सातवा हप्ता मोठा दिलासा ठरणार आहे.”
advertisement
याचबरोबर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेती पिकांचे पंचनामे अंतिम टप्प्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना वेगळ्या अनुदानाच्या स्वरूपात मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
राज्यातील मोठ्या प्रमाणातील शेतकरी या योजनेत समाविष्ट असल्याने सातव्या हप्त्याची आतुरता सर्वत्र आहे. थेट बँक खात्यात निधी जमा झाल्याने शेतकऱ्यांना वेळीच आर्थिक सहाय्य मिळेल. खरीप हंगामातील शेतीखर्च, खत-बियाण्यांची खरेदी तसेच इतर आवश्यक गरजांसाठी हा निधी मोलाचा ठरणार आहे.
advertisement
दरम्यान, राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे. सप्टेंबरमध्ये मिळणारा सातवा हप्ता हा ९३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांतून वर्षाकाठी मिळणारे १२,००० रुपये शेतकऱ्यांच्या हातात थेट पोहोचत असल्याने त्यांच्या शेती व कुटुंबीयांच्या गरजांमध्ये थोडाफार दिलासा मिळत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 11:33 AM IST