PMPML bus service : काहीही करा पण बस गावातून येऊ द्या! नागरिकांसह विद्यार्थ्यांची प्रशासनाला आर्त हाक

Last Updated:

Vadgaon Maval News : गेल्या काही वर्षांपासून वडगावमधून जाणाऱ्या पीएमपी बस सेवा थेट महामार्गावरून जाण्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शालेय विद्यार्थी, कामगार, महिला आणि वृध्द नागरिकांना बस पकडण्यासाठी पायपीट करत महामार्गावर जावे लागते.

News18
News18
वडगाव मावळ : गेल्या काही वर्षांपासून वडगाव शहरातून जाणारी पीएमपी बस गावाच्या मध्यभागातून न जाता थेट मुंबई-पुणे महामार्गाने जात असल्याने शहरातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या त्रासात आहेत. शहराच्या विविध भागातून बस पकडण्यासाठी नागरिकांना महामार्गावर जाऊन पायपीट करावी लागते. शालेय विद्यार्थी, कामगार, महिला अगदी वृध्द नागरिकही वेळेवर बस पकडण्यासाठी धावपळ करत आहेत. या समस्येवरून शहरवासीय मागणी करत आहेत की बससेवा पुन्हा पूर्वीप्रमाणे शहराच्या मुख्य रस्त्याने सुरू करावी.
वडगाव शहर हे मावळ तालुक्याचे मुख्यालय असून, येथून निगडी, कात्रजपर्यंत बससेवा अनेक वर्षांपासून चालू आहे. पूर्वी बस शहरातील मुख्य रस्त्यानेच जात होती. मात्र, मोठ्या प्रमाणावर अस्ताव्यस्त पार्किंग आणि सतत निर्माण होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे बसला शहराच्या बाहेरून महामार्गावर मार्गक्रमण करावे लागले. या कारणामुळे शहरातील केशवनगर, म्हाळसकरवाडी, छत्रपती संभाजी महाराजनगर, खंडोबा मंदिर परिसर, ढोरेवाडा, चव्हाणवाडा यांसारखे रहिवासी भाग महामार्गापासून लांब असल्याने नागरिकांना बस मिळवण्यासाठी मोठे अंतर पार करावे लागते.
advertisement
शहरातील या रहदारीच्या परिसरात मोठ्या संख्येने कामगारवर्ग वास्तव्यास असून विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. त्यामुळे बससेवा महामार्गावर जाण्यामुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात अडचणी येतात. मुख्य स्टॉप्स जसे की महादजी शिंदे स्मारकाजवळ, मातोश्री हॉस्पिटलजवळ किंवा स्वागत कमानीजवळ पोहोचण्यासाठी लोकांना पळत-पळत जावे लागते. उशिरा घरातून निघाल्यास वेळप्रसंगी बस पकडणे अगदी अवघड होते.
शहरातील अस्ताव्यस्त पार्किंग आणि वाहतूककोंडी ही बस महामार्गावर जाण्याचे मुख्य कारण आहे. तरीही, शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ते नुकतेच रुंदीकरण आणि काँक्रीटिंग केले असले तरीही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्किंग केलेली वाहने, दुकानदारांनी रस्त्यावर ठेवलेली वस्तू आणि ग्राहकांची वाहने यामुळे वाहतूककोंडी अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे. जर पीएमपी बससेवा पुन्हा गावातून मार्गक्रमित केली गेली, तर अस्ताव्यस्त पार्किंगवर नियंत्रण ठेवता येईल आणि शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकेल.
advertisement
शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि कामगार यांची सुरक्षित आणि सोपी प्रवासाची गरज लक्षात घेता, बससेवा पूर्वीप्रमाणे गावातील मुख्य रस्त्यानेच चालवली जाणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवासात त्रास कमी होईल, पार्किंग व वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवता येईल आणि शहराची वाहतूक सुरळीत राहील.
मराठी बातम्या/पुणे/
PMPML bus service : काहीही करा पण बस गावातून येऊ द्या! नागरिकांसह विद्यार्थ्यांची प्रशासनाला आर्त हाक
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement