घरातून येत होता विचित्र आवाज, दरवाजा तोडताच समोर प्रकाश; नंतर दिसलं असं दृश्य, पोलीसही थक्क

Last Updated:

Shocking things Inside Home : एका घरात सतत विचित्र आवाज येत होते. घरमालकाने हे आवाज ऐकले होते. पोलिसांनी घरावर छापा टाकला तेव्हा हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
नवी दिल्ली : कल्पना करा की तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात आहात आणि रात्री अचानक तुम्हाला विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की ते वाऱ्याचा परिणाम असेल, नंतर तुम्हाला वाटले की उंदीर असतील. पण जेव्हा खरं रहस्य उघड झालं तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकली. अमेरिकेच्या ओरेगॉन राज्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. जिथं एक माणूस अनेक महिन्यांपासून घराखालील क्रॉल स्पेसमध्ये गुप्तपणे राहत होता.
ही विचित्र घटना पोर्टलँडजवळील हॅपी व्हॅली नावाच्या परिसरात घडली. एका घरात सतत विचित्र आवाज येत होते. घरमालकाने हे आवाज ऐकले होते. पोलिसांनी घरावर छापा टाकला तेव्हा हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.
रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना माहिती दिली की एक अज्ञात व्यक्ती कारमधून उतरून थेट एका घराच्या मागच्या बाजूला गेली. प्रत्यक्षदर्शीने पाहिलं तेव्हा त्याला आढळलं की घराखालील क्रॉल स्पेसचा दरवाजा उघडा होता आणि आतून प्रकाश येत होता पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दरवाजा तुटलेला होता आणि कुलूप बदललेलं होतं. एका व्हेंटमधून एक विजेची तार आत जाताना दिसली. यामुळे संशय आणखी बळावला.
advertisement
जेव्हा दरवाजा तोडला तेव्हा आतील दृश्य एखाद्या मिनी अपार्टमेंटसारखं होतं. टीव्ही, चार्जर, लाईट आणि बेड सर्व तिथे होतं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार बेन्जामिन बुकर नावाचा 40 वर्षीय माणूस बराच काळ तिथे राहत होता. चौकशीत असं दिसून आलं की तो घरातून वीजही चोरत होता. पोलिसांच्या झडतीदरम्यान, तिथून एक मेथ पाईप देखील जप्त करण्यात आली. याचा अर्थ असा की तो माणूस केवळ बेकायदेशीरपणे राहत नव्हता, तर तो ड्रग्जचं साहित्य देखील ठेवत होता. त्याला ताबडतोब अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं.
advertisement
घरमालक म्हणाला, त्याला विचित्र आवाज येत होते, पण ते फार गांभीर्याने घेतले नाहीत. पण वास्तव काहीतरी वेगळंच असल्याचं दिसून आलं. त्याला माहित नव्हतं की त्याच्या घराखाली कोणीतरी राहत आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. इतर लोकही घाबरले आहेत आणि लोक आता त्यांच्या घरांच्या क्रॉल स्पेस तपासत आहेत.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
घरातून येत होता विचित्र आवाज, दरवाजा तोडताच समोर प्रकाश; नंतर दिसलं असं दृश्य, पोलीसही थक्क
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement