Aajache Rashibhavishya: गुड न्यूज की टेन्शन, शुक्रवारी तुमच्या नशिबात काय? मेष ते मीन आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: शुक्रवारी मेष ते मीन 12 राशींच्या आयुष्यात मोठे बदल जाणवतील. सत्ता, संपत्ती, विवाह, आरोग्य याबाबत आजचं राशीभविष्यच्या माध्यमातून जाणून घेऊ.
मेष राशी -आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते. जितके शक्य असेल तितके या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
वृषभ राशी -चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. आज तुम्ही आपल्या लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्व ही देऊ शकतात. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील, तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. आज तुमचा शुभ अंक 3 आणारा आहे.
advertisement
मिथुन राशी - अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. तुमच्या बायकोच्या कामकाज व्यवहारात तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होईल. अविवाहित मंडळीना आज आनंदाची बातमी मिळू शकते. आज राहिलेले कामे मार्गी लागतील. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
कर्क राशी -पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. परमानंदाचा अनुभव घ्या. हे एक उत्तम दिवसांपैकी एक दिवस आहे जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगले वाटेल. आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 5 आणारा आहे.
advertisement
सिंह राशी -छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. कमिशन-लाभांश- किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. आज अनेक गोष्टी अचानक समोर आल्याने आनंद तुम्हाला मिळणार आहे. आजचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
कन्या राशी -तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घकाळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. मदतीची गरज असलेल्या मित्रांना भेटा. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. आज तुमचा शुभ अंक 2 आणारा आहे.
advertisement
तूळ राशी-तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाला शीघ्रकोपी बनवतील. तुम्ही गरजेच्या कामांना करणे विसराल. नको त्या गोष्टीत विचार करू नका. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी -नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणवेल - म्हणून अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका. जे लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते आज त्यांनी आपल्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. जमिनी संदर्भातील व्यवहार पूर्ण होईल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
धनु राशी-अति उत्साह आणि भयकारी महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहे आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 3 आहे.
advertisement
मकर राशी -तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. विवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 3 आहे.
advertisement
कुंभ राशी -तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून देवाण-घेवाणीने जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल. आज आवडत्या व्यक्ती कडून मनासारखे वर्तवणूक मिळू शकते. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.
advertisement
मीन राशी-ध्यानधारणा आणि स्वत्वाची जाणीव होणे हे लाभदायक सिद्ध होईल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. आज कार्यक्षेत्रात तुमच्या कुणी जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला घेऊ शकतात. एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय, याची जाणीव आज तुम्हाला होईल. 7 हा तुमचा शुभ अंक असणार आहे.
advertisement


