Weather Alert: मराठवाड्यात हवापालट! तीन जिल्ह्यांत विजा कडाडणार, इथं गारठा वाढणार
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तुरळक पावसाची शक्यता आहे.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस हजरी लावत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात 6 नोव्हेंबरला काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मराठवाड्यात गुरुवारनंतर हवापालट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
advertisement
मराठवाड्यातील काही भागात किमान तापमानात घट झाल्याने थंडी वाढली आहे. आता गुरूवारनंतर मराठवाड्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये 6 नोव्हेंबर रोजी कमाल आणि किमान तापमानात प्रत्येकी एका अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. येथील किमान तापमान 20 अंशावर राहील.
advertisement
advertisement








