Mumbai Metro : मेट्रोने प्रवास करताय? 'उबर' अॅप डाउनलोड करणं आता गरजेचं; नेमकं कारण काय?
Last Updated:
Uber App Metro Ticket : जर तुम्ही मेट्रोमधून दररोज प्रवास करता किंवा करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, कारण आता मेट्रोचे तिकीच बुक काढणे अत्यंत सोपे झाले आहे. नेमका प्रवाशांना कसा फायदा होणार आहे ते खालीलप्रमाणे पाहूयात.
मुंबई : दररोज मुंबई मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखीच सोपा आणि वेगवान होणार आहे. कारण मुंबईतील मुख्य मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता तिकीट काढण्यासाठी उबरने एक नवा पर्याय दिलेला आहे. सुरुवातीस दिल्ली आण चैन्नईमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबईही हे करण्यात आलेले आहे.
मुंबई मेट्रो लाइन 1 चे तिकीट बुकिंग आता 'उबर'च्या माध्यमातून
मुंबईतील सर्वात पहिला मेट्रो मार्ग अर्थात वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर प्रवाशांना उबर अॅपमधून तिकीट काढता येणार आहे. या नव्या सेवेमुळे प्रवाशांना मेट्रोच्या स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी भल्या मोठ्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही, यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे योग्य नियोजन करता येईल आणि वेळेचीही मोठी बचत करता येणार आहे.
advertisement
प्रवाशांना होणार मोठा फायदा?
उबर अॅपच्या या सुविधेमध्ये प्रवाशी आता त्यांच्या स्मार्टफोनवर तिकीट बुकिंग करू शकतात. याशिवाय या अॅपमध्ये प्रवाशांना रक्कम सुरक्षित पद्धतीने भरणे शक्य आहे आणि क्युआर कोडद्वारे तिकीट स्कॅन करून मेट्रोमधून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
मुंबई मेट्रो 1 आणि ओएनडीसी नेटवर्कच्या सहकार्याने राबवण्यात आलेला हा उपक्रम प्रवाशांना एक आधुनिक, डिजिटल आणि स्मार्ट प्रवास अनुभव उपलब्ध करून देतो. तिकीट काढण्याची ही सुविधा दररोज प्रवाशांसाठी जास्त करुन फायदेशीर ठरणार आहे. कारण मेट्रोचा प्रवास मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि दररोज लाखो लोक मेट्रोचा वापर करतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 8:19 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro : मेट्रोने प्रवास करताय? 'उबर' अॅप डाउनलोड करणं आता गरजेचं; नेमकं कारण काय?


