advertisement

Weather Alert: कोकणात वादळी पाऊस, 48 तास महत्त्वाचे, मुंबईसह 6 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात ऑक्टोबर अखेर देखील पावसाचा जोर कायम आहे. आज कोकणातील मुंबईसह सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/4
सध्या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीचीही महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कायम आहे. गेल्या आठवड्याभरात राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. दिवाळीच्या उंबरठ्यावरही पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना हवामान विभागाने आज म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट दिला आहे.
सध्या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीही महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कायम आहे. गेल्या आठवड्याभरात राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. दिवाळीच्या उंबरठ्यावरही पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना हवामान विभागाने आज म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
2/4
मुंबई शहरात आज हवामान बदलत्या स्वरूपाचे राहणार आहे. काही भागांमध्ये सकाळपासून ऊन पडेल, तर दुपारी आभाळ भरून येण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, दुपारनंतर आणि सायंकाळी काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

3/4
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात कालपासूनच हवामान ढगाळ राहिले असून आज देखील काही भागांमध्ये पावसाच्या सरी पडतील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दुपारी आणि संध्याकाळच्या सुमारास जोरदार सरी कोसळू शकतात. काही भागात विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज असून वाहतूक आणि नागरिकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात कालपासूनच हवामान ढगाळ राहिले असून आज देखील काही भागांमध्ये पावसाच्या सरी पडतील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दुपारी आणि संध्याकाळच्या सुमारास जोरदार सरी कोसळू शकतात. काही भागात विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज असून वाहतूक आणि नागरिकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
advertisement
4/4
आठवडाभर पालघर जिल्ह्यात पाऊस हा जोरदार पडतोय. आजही इथल्या ग्रामीण भागांमध्ये सकाळपासून रिमझिम सरी सुरू झाल्या असून काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तापमानात थोडीशी घट झाली असून आर्द्रतेत वाढ झाली आहे.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement