Satara Doctor : 'मरणारी व्यक्ती कधीही खोटं बोलत नसते', सातारा डॉक्टर प्रकरणात सरकारी वकिलांचा 'डायिंग डिक्लेरेशन' युक्तीवाद काय?

Last Updated:

Satara Lady Doctor Case : मरणारी व्यक्ती कधीही खोटे बोलत नसते, असा दाखला देत सात दिवसांची पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी यावेळी केली.

Satara Phaltan Doctor Case Suspect
Satara Phaltan Doctor Case Suspect
Satara Crime News : सातारा जिल्ह्यातील फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं. या प्रकरणातील आरोपी PSI गोपाल बदने हा स्वतःहून फलटण पोलिस स्टेशनला हजर झाला होता. त्यानंतर त्याला फलटण कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद केल्याचं पहायला मिळालं. यावेळी सरकारी वकील ॲड. सुचिता वायकर-बाबर यांनी जोरदार युक्तीवाद केला अन् गोपाळ बदने याच्या अडचणीत वाढ केली.

मरणारी व्यक्ती खोटे बोलत नसते

सुसाईड नोटमध्ये असलेल्या बलात्काराच्या उल्लेखाचा तपास करायचा आहे. डिजीटल पुरावे शोधण्यासाठी काही दिवसांची मुदत आवश्यक आहे. पण मरणारी व्यक्ती कधीही खोटे बोलत नसते, असा दाखला देत आरोपीच्या वैद्यकीय चाचण्या, मोबाईल, वाहन आणि घटनास्थळाचा तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी यावेळी केली.
advertisement

लॅटिन टर्मिनॉलॉजीचा संदर्भ दिला

आरोपी क्रमांक दोन म्हणजेच गोपाल बदने याला बळीचा बकरा बनवण्यात आले आहे, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता. सरकारी वकिलांनी यांनी यावेळी लॅटिन टर्मिनॉलॉजीचा संदर्भ देखील दिला. सुसाईड नोट हे 'डायिंग डिक्लेरेशन' असल्यानं ते सत्य मानलं जावं. याआधी सर्वोच्च न्यायालयाने देखील अनेक दाखले दिले आहेत, असं म्हणत सरकारी वकिलांनी आरोपीच्या वकिलांचा मुद्दा खोडून काढला.
advertisement

डायिंग डिक्लेरेशन काय असतं?

'डायिंग डिक्लेरेशन'ला (Dying Declaration) मराठीत 'मृत्यूपूर्व जबाब' किंवा 'मृत्युकालिक कथन' असे म्हणतात. हा भारतीय पुरावा कायदा, 1872 च्या कलम 32(1) अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर पुरावा आहे. मृत्यूपूर्व जबाब म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूच्या कारणाबद्दल किंवा ज्या परिस्थितीत तिचा मृत्यू झाला त्या परिस्थितीबद्दल मरणासन्न अवस्थेत केलेले मौखिक किंवा लेखी स्टेटमेंट मानलं जातं. हा जबाब 'नेमो मॅरिटुरस प्रीसुमुंटूर मेंट्री' (Nemo Mariturus Presumuntur Mentri) या कायदेशीर तत्त्वावर आधारित आहे, ज्याचा अर्थ आहे की 'मरणाच्या दारात उभी असलेली व्यक्ती खोटे बोलणार नाही.'
advertisement

बलात्काराची तक्रार केली गेली नाही

दरम्यान, गोपाळ बदनेच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले की, "मयत डॉक्टरकडे पोलीस अटक केलेल्या आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन गेले होते. माझी ड्युटी असतानाच आरोपींना का आणता यावरून वाद झाले होते. 25 जून रोजी दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी बलात्काराची तक्रार केली गेली नाही."
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara Doctor : 'मरणारी व्यक्ती कधीही खोटं बोलत नसते', सातारा डॉक्टर प्रकरणात सरकारी वकिलांचा 'डायिंग डिक्लेरेशन' युक्तीवाद काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement