advertisement

Gold Loan Calculator : 10 ग्रॅम सोनं गहान ठेवलं तर बँक किती कर्ज देते? EMI किती पडतं, जाणून घ्या A To Z माहिती

Last Updated:

पण अनेकांच्या मनात शंका असते की, माझ्याकडे 10 ग्रॅमची चैन किंवा अंगठी आहे, तर त्यावर बँक नेमके किती पैसे देईल? व्याज किती लागेल आणि तो हिशोब नक्की करतात तरी कसा? चला तर मग, गोल्ड लोनचं 'ए टू झेड' गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : दैनंदिन आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते की, समोर अचानक खर्चाचा डोंगर उभा राहतो आणि सेविंग कमी पडते. मग ते हॉस्पिटलचं बिल असो, मुलांचं ॲडमिशन असो किंवा व्यवसायातील अचानक आलेली गरज. अशा वेळी आपली सर्वात मोठी ताकद ठरते ती म्हणजे कपाटात जपून ठेवलेलं 'सोनं'. सोन्यावर कर्ज घेणं (Gold Loan) हा केवळ आर्थिक पर्याय नाही, तर तो अडचणीच्या वेळी सर्वात सन्मानाने मिळणारा आधार आहे.
पण अनेकांच्या मनात शंका असते की, माझ्याकडे 10 ग्रॅमची चैन किंवा अंगठी आहे, तर त्यावर बँक नेमके किती पैसे देईल? व्याज किती लागेल आणि तो हिशोब नक्की करतात तरी कसा? चला तर मग, गोल्ड लोनचं 'ए टू झेड' गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया.
सोन्यावर कर्ज घेणं ही प्रक्रिया जितकी सोपी दिसते, त्यामागे बँकांचे काही ठराविक नियम असतात. तुम्ही बँकेत सोनं नेता तेव्हा नक्की काय होतं, ते पहा:
advertisement
1. 'LTV' रेशो म्हणजे काय?
रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार, बँका सोन्याच्या एकूण मूल्याच्या 75% पर्यंत कर्ज देऊ शकतात. यालाच 'Loan to Value' (LTV) म्हणतात. म्हणजे जर तुमच्या सोन्याची आजची किंमत 1 लाख रुपये असेल, तर बँक तुम्हाला जास्तीत जास्त 75,000 रुपयांपर्यंत कर्ज देईल.
2. 10 ग्रॅमवर किती कर्ज मिळेल?
समजा आज सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी (24 कॅरेट) सुमारे 1,30,000 रुपये आहे. पण आपले दागिने सहसा 22कॅरेटचे असतात. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत समजा 1,24,000 रुपये आहे.
advertisement
बँक आधी दागिन्यांचे वजन करते. लक्षात ठेवा, जर तुमच्या अंगठीत किंवा मण्यात खडे (Stones/Diamonds) असतील, तर बँक त्याचं वजन वजा करते. निव्वळ सोन्यावरच कर्ज मिळतं. आता 1,24,000 च्या 75% हिशोबाने तुम्हाला साधारण 90,000 ते 93,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं.
3. EMI आणि व्याजदर किती असतो?
गोल्ड लोनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याचा व्याजदर वैयक्तिक कर्जापेक्षा (Personal Loan) कमी असतो.
advertisement
बँका साधारणपणे 8% ते 12% व्याज आकारतात. काही फायनान्स कंपन्यांचा दर 18% पर्यंतही असू शकतो.
तुम्ही दरमहा हप्ते (EMI) भरू शकता किंवा अनेक बँकांमध्ये फक्त दरमहा व्याज भरून मुद्दल शेवटी भरण्याचा (Bullet Repayment) पर्यायही असतो.
कर्ज घेण्यापूर्वी या 5 गोष्टी नक्की तपासा:
1. घडणावळ धरली जात नाही: तुम्ही दागिने घेताना दिलेली 'मेकिंग चार्जेस' किंवा जीएसटीची रक्कम बँक कर्ज देताना गृहीत धरत नाही. केवळ सोन्याचे वजन आणि शुद्धता पाहिली जाते.
advertisement
2. सिबिल स्कोरची चिंता नाही: सोन्याचं कर्ज हे 'सिक्युअर्ड लोन' असल्यामुळे तुमचा सिबिल स्कोर कमी असला तरी तुम्हाला कर्ज सहज मिळतं.
3. प्रक्रिया शुल्क (Processing Fee): बँक साधारण 0.5 % ते 1 % प्रोसेसिंग फी आकारते.
4. बिस्किटांवर कर्ज: अनेक बँका फक्त दागिन्यांवर कर्ज देतात, सोन्याच्या 24कॅरेट बिस्किटांवर कर्ज देण्यासाठी काही विशेष अटी असू शकतात.
advertisement
5. जर तुम्ही वेळेवर व्याज भरलं नाही, तर बँक तुमचं सोनं लिलावात काढू शकते, त्यामुळे परतफेडीचं नियोजन आधीच करा.
आजच्या सोन्याच्या वाढलेल्या भावामुळे 10 ग्रॅम सोन्यावर तुम्हाला आरामात 85,000 ते 95,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. जलद प्रक्रिया आणि कमी कागदपत्रे यामुळे संकटकाळी सोनं गहाण ठेवणं हा एक स्मार्ट निर्णय ठरू शकतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Loan Calculator : 10 ग्रॅम सोनं गहान ठेवलं तर बँक किती कर्ज देते? EMI किती पडतं, जाणून घ्या A To Z माहिती
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement