'संजू जरा आवर घाल...', भरसभेत गुलाबराव पाटलांचं संजय गायकवाडांवर मोठं विधान

Last Updated:

शिवसेना शिंदे गटाचा बुलढाण्यात मेळावा पार पडला. या मेळाव्यातून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना भर सभेत कानपिचक्या दिल्या आहेत.

News18
News18
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. मंगळवारी निवडणूक आयोगानं नगर पंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सर्व पक्ष कामाला लागले आहेत. विविध ठिकाणी जाऊन दौरे आणि मेळावे घेतले जात आहेत.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचा बुलढाण्यात मेळावा पार पडला. या मेळाव्यातून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना भर सभेत कानपिचक्या दिल्या आहेत. संजू भाऊ तू जरा आवर घाल, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी संजय गायकवाडांना कानपिचक्या दिल्या आहेत. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यानंतर विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
advertisement

गुलाबराव पाटील नक्की काय म्हणाले?

बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकरमध्ये शिवसेनेकडून कार्यकर्त्यांसाठी 'प्रशिक्षण मेळावा' घेण्यात आला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न झाला. त्यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार संजय गायकवाड यांना आपल्या बेजबाबदारपणाच्या विधानाला आवर घाल, असं म्हणून चांगल्याच काणपिचक्या दिल्या. आमदार गायकवाड हे विविध वादग्रस्त विधानामुळे राज्यभर चर्चेत असतात. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या विधानावरून त्यांना चांगलेच सुनावले. संजू जरा स्वतःला आवर, असं म्हणून त्यांनी गायकवाड यांना कणपिचक्या दिल्या. मात्र आमचा पक्ष हा गुंडाचाच पक्ष असल्याचं विधानही त्यांनी यावेळी केलं.
advertisement
शिवसेना मेळाव्यात भाषण करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, "संजू भाऊ जरा तू आवर ना भो... हा आमचा डॉन आहे... अरे दिवानों मुझे पहचानो. सांगायचं तात्पर्य असं की एक एक हिरे शिवसेनेमध्ये आहेत. आम्हाला लोक गुंडे म्हणतात. पण त्यांनी आम्हाला गुंड म्हणू दे... षंड असण्यापेक्षा गुंड असणं बरं..." असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'संजू जरा आवर घाल...', भरसभेत गुलाबराव पाटलांचं संजय गायकवाडांवर मोठं विधान
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement