Montha Cyclone update: 2 चक्रीवादळांमध्ये अडकला महाराष्ट्र, एकाचा स्पीड 110 तर दुसरं 50 किमी वेग, कुठे धडकणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अरबी समुद्रातील डीप डिप्रेशन आणि मोंथा चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा, विदर्भात रेड अलर्ट, शाळा बंद, मच्छीमारांना इशारा, अमित भारद्वाज यांचा हवामान अंदाज.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. ओडिशामध्येही वादळाच्या तीव्रतेमुळे प्रशासनाने ८ जिल्ह्यांना 'रेड झोन' म्हणून घोषित केले आहे. या जिल्ह्यांमध्ये या वादळाचा सर्वाधिक गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. मालकानगिरी, कोरापुट, नबरंगपूर, रायगडा, गजपती, गंजम, कंधमाळ आणि कालाहांडी. यांना रेड झोन घोषित केलं आहे.
advertisement
या सगळ्याचा महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे. हवामान तज्ज्ञ अमित भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार 28 ऑक्टोबर रोजी विदर्भ-मराठवाड्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भाच्या आजूबाजूच्या पट्ट्यात रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवश ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मोंथा चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा पावसाचं संकट आलं आहे.
advertisement
हवामान तज्ज्ञ अमित भारद्वाज यांच्या म्हणण्यांनुसार, 29 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा मध्य भारतात आणि महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात तळ कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राचा काही पट्ट्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 31 ऑक्टोबर रोजी पावसाचा जोर कमी होईल आणि हलक्या स्वरुपाचा राहणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तूर्तास पावसाचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही.


