CM Devendra Fadnavis On Satara Doctor Case : त्या आरोपींना तात्काळ अटक करा, फलटण महिला डॉक्टर प्रकरणी CM फडणवीस अॅक्शन मोडवर
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
CM Devendra Fadnavis On Satara Doctor Case : तरुणी डॉक्टरने आपल्या हातावर सुसाइड नोट लिहित आयुष्य संपवलं. आता या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतली आहे.
मुंबई: सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या धक्कादायक प्रकरणाने साताऱ्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. तरुणी डॉक्टरने आपल्या हातावर सुसाइड नोट लिहित आयुष्य संपवलं. आता या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतली आहे.
काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकलेल्या या डॉक्टरांनी अखेर मानसिक तणावाला कंटाळून स्वतःचा जीव घेतला.
महिला डॉक्टर या काही दिवसांपासून वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादामुळे सतत चौकशीला सामोऱ्या जात असल्याची माहिती समोर आली होती. “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन,” अशी तक्रार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात दिल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून त्या नैराश्यात देखील असल्याचं समोर आलं होतं. अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.
advertisement
हातावर सुसाईड, पोलिसावर आरोप...
महिला डॉक्टरने आपला मानसिक छळ आणि बलात्कार झाल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटले. त्यांनी पीएसआय गोपाळ बदने यांनी 4 वेळा बलात्कार केल्याचे म्हटले. तर, घर मालकाचा मुलगा प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिला असल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटले. पोलिसांनीच अत्याचार केल्याने राज्यात संतापाची लाट उसळली.
मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश...
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील प्रकरणाची गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पीएसआय बदने याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय, फलटण प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
इतर संबंधित बातमी:
advertisement
view comments
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
October 24, 2025 12:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
CM Devendra Fadnavis On Satara Doctor Case : त्या आरोपींना तात्काळ अटक करा, फलटण महिला डॉक्टर प्रकरणी CM फडणवीस अॅक्शन मोडवर


