Gold Price Prediction : सोन्याचा दर रिव्हर्स गिअर टाकणार! 45 वर्षापूर्वींचा इतिहास पुन्हा घडणार? एक्सपर्ट म्हणतात, आता...
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Gold Price Prediction : सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर पुन्हा 45 वर्षांपूर्वीचा इतिहास घडणार का, याबाबत तज्ज्ञांमध्ये खल सुरू झाला आहे.
Gold Price Prediction: सोन्याच्या दराने चांगलाच दर गाठला आहे. दिवाळीच्या काही दिवसात सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली होती. मात्र, सोनं खरेदी करणं हे सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर असल्याची प्रतिक्रिया उमटली होती. सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर पुन्हा 45 वर्षांपूर्वीचा इतिहास घडणार का, याबाबत तज्ज्ञांमध्ये खल सुरू झाला आहे. असे झाल्यास सोन्याचा दर एक लाखापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या किमतीत झालेल्या विक्रमी वाढीनंतर, तज्ज्ञांनी त्याची तुलना 1980 च्या दशकाशी वारंवार केली आहे. सोन्याने 1980 मध्ये गाठलेल्या महागाईच्या पातळीला ओलांडले होते.
1980 मध्ये विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, पुढील वर्षांत सोन्याच्या किमती निम्म्याहून अधिक घसरल्या. यामुळे सोन्याच्या सध्याच्या तेजीनंतर तीव्र घसरण होऊ शकते का अशी चिंता निर्माण झाली आहे. दिवाळीच्या दरम्यानही सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली होती.
1980 मध्ये सोन्याचा दर किती होता?
जानेवारी 1980 मध्ये, सोन्याच्या किमती त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या. त्यावेळी सोने जवळजवळ 850 अमेरिकन डॉलर्स प्रति औंसवर पोहोचले. त्यावेळी हा एक विक्रम होता. (महागाईनुसार समायोजित केल्यास, हा आकडा 3400 डॉलर प्रति औंस जवळ होता. हा दर या वर्षी सोन्याने ओलांडला.) मात्र, 1982 ते 1985 दरम्यान, सोन्याच्या किमती प्रति औंस 300-400 डॉलरपर्यंत घसरल्या आणि दशकाच्या अखेरीस (1989) किंमती प्रति औंस 380-420 डॉलर दरम्यान स्थिर राहिल्या. याचा अर्थ असा की, तीव्र वाढीनंतर, सोन्याच्या किमतीत सुधारणा दिसून आली, जी मागील पातळीच्या निम्म्यापेक्षा कमी झाली.
advertisement
एक्सपर्ट काय म्हणाले?
CNBC TV18 सोबत बोलताना, कामाख्या ज्वेल्सचे सह-संस्थापक मनोज झा म्हणाले की, सोने "बबल झोन" मध्ये प्रवेश करत असल्याचे दिसून येते. येत्या काही महिन्यांत नफा-वसुलीचा काळ येण्याची शक्यता आहे. झा यांच्या मते, "सोने एका वळणावर पोहोचले आहे. गुंतवणूकदारही थोडे चिंतेत आहेत. यापूर्वी, 1979-80 मध्ये आणि पुन्हा 2010-11 मध्ये सोन्यात लक्षणीय वाढ झाली. मात्र, त्या उच्चांकांनंतर, त्यात लक्षणीय घट झाली. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
सोनं सध्या ओव्हरबॉट झाले आहे. मात्र,नजिकच्या काळात सोन्याच्या किमतीत सुमारे 300-400 डॉलर प्रति औंसची घसरण होईल असे झा यांचे मत आहे. मात्र, जोपर्यंत कोणतेही महत्त्वपूर्ण संकेत मिळत नाहीत तोपर्यंत ही घसरण नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करेल, ज्यामुळे सोन्याला त्याची दीर्घकालीन कामगिरी टिकवून ठेवता येईल, असे म्हटले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 24, 2025 12:46 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Price Prediction : सोन्याचा दर रिव्हर्स गिअर टाकणार! 45 वर्षापूर्वींचा इतिहास पुन्हा घडणार? एक्सपर्ट म्हणतात, आता...









