Weather Alert: 27 डिसेंबरला बर्फासारखी थंडी, पुणे-मुंबईत पारा घसरला, IMD चा पुन्हा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील विविध भागात थंडीचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी बर्फासारखी थंडी जाणवत आहे. शनिवारचं अपडेट जाणून घेऊ.
1/5
डिसेंबर अखेर राज्यात पुन्हा गारठा वाढला आहे. काही ठिकाणी पारा 10 अंशांच्या खाली गेला असून थंडीसह धुक्याचे सावट आहे. उत्तर महाराष्ट्रसह विदर्भात थंडीची लाट असल्याची स्थिती आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज, 27 डिसेंबर रोजी देखील थंडी कायम राहणार असून हवामान कोरडे राहील. शनिवारचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरसह संपूर्ण कोकण पट्ट्यात हवामान मुख्यतः कोरडे राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात किमान तापमान सुमारे 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडावा जाणवेल, मात्र दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका जाणवू शकतो. ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्येही अशीच स्थिती राहणार असून, हवेत आर्द्रता कमी असल्याने गारवा अधिक बोचरा भासण्याची शक्यता आहे.

3/5
पुणे जिल्ह्यात थंडीचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवत आहे. शहरात किमान तापमान सुमारे 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली राहणार असून, कमाल तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. सकाळच्या वेळी पुणे शहरासह परिसरात धुक्याची शक्यता असल्याने दृश्यमानता कमी होऊ शकते. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग, मुळशी, भोर, आंबेगाव आणि जुन्नर परिसरात गारठा अधिक तीव्र जाणवण्याची शक्यता असून, रात्री आणि पहाटे थंडीचा प्रभाव वाढलेला राहील.

4/5
मराठवाडा आणि विदर्भ या भागांतही थंडी कायम आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी परिसरात किमान तापमान 11 ते 12 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे. विदर्भात नागपूरमध्ये किमान तापमान सुमारे 11 अंश सेल्सिअस राहील, तर गोंदिया भागात तापमान दहाच्या खाली नोंदवले गेले असल्याने सकाळचा गारठा अधिक तीव्र आहे. या भागांत आकाश निरभ्र राहणार असून, दिवसभर कोरडे हवामान अनुभवायला मिळेल.

5/5
एकंदरीत पाहता, 27 डिसेंबर रोजी राज्यातील प्रमुख शहरी आणि ग्रामीण भागांत पावसाची कोणतीही शक्यता नसून थंडीचा प्रभाव कायम राहणार आहे. काही ठिकाणी किमान तापमान स्थिर राहील, तर काही भागांत थोडीफार घट जाणवू शकते. पुढील काही दिवस हीच स्थिती सुरू राहण्याचा अंदाज असून, नागरिकांनी सकाळी आणि रात्री थंडीपासून संरक्षणासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement