ऑनलाईन ओळखीनंतर डेटिंग! पहिल्याच भेटीत तरुणीने असं काही मागितलं, घाबरला तरुण; कसाबसा वाचवला स्वत:चा जीव

Last Updated:
Online Dating Fraud : एका पुरूषाने तो एका महिलेच्या जाळ्यात अडकून तो कसा सुटला याबाबत त्याचा शॉकिंग अनुभव सांगितला आहे. सोशल मीडियावर त्याने आपली संपूर्ण स्टोरी सांगितली आहे.
1/5
आजकाल ऑनलाइन डेटिंगचा काळ आहे. लोक डेटिंग अॅप्सवर, चॅटवर भेटतात आणि तिथं पटलं तर मग ते एकमेकांना समोरासमोर भेटतात. पण  डेटिंग अॅप्सद्वारे फसवणूक देखील मोठ्या प्रमाणात होते, म्हणूनच लोकांनी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. अलीकडेच एका तरुणाने सोशल मीडियावर त्याचा असाच एक अनुभव शेअर केला आहे. त्याच्यासोबत काहीही गंभीर घडलं नसलं तरी, त्याला संकटाची जणू चाहुल लागली आणि त्याने कसाबसा स्वतःचा जीव वाचवला.

advertisement
2/5
मुलाने सांगितल्यानुसार तो  गाझियाबादला गेला. काही दिवसांनी त्याने टिंडर या डेटिंग अॅपवर साक्षी नावाच्या मुलीशी चॅटिंग सुरू केलं. काही तासांतच त्या मुलीने त्याला तिचा व्हॉट्सअॅप नंबर दिला आणि दोघंही तिथं चॅटिंग करू लागले. साक्षी त्या मुलाला भेटायला खूप उत्सुक होती. आपल्याला भेटायचं आहे, असं ती ती त्याला दिवसातून चार-पाच वेळा सांगायची. शेवटी त्या मुलाने थोडा वेळ काढून तिला भेटण्याचा बेत आखला.

3/5
ते राज नगरमधील एका शोरूमजवळ भेटले. तिथं चालत चालत ते एका कॅफेजवळ पोहोचले आणि तिथं बसण्याचा विचार करत होते. पण मुलीने जवळच्या एका इमारतीकडे बोट दाखवलं आणि म्हणाली, चल तिथं जाऊया. मुलाला वाटलं की तिने तिथं जायचं हे आधीच ठरवलं होतं. तो एक भूमिगत बार होता. जेव्हा ते आत गेले तेव्हा खूप धूर होता आणि ती जागा संशयास्पद वाटत होती. मुलाला काहीतरी गडबड आहे असा संशय येऊ लागला. म्हणून त्याने तिथे जाण्यास नकार दिला आणि मॅकडोनाल्डसारख्या ठिकाणी जाऊ असं सुचवलं.

4/5
पण मुलीला ते आवडलं नाही, ती त्याला तिथं जाण्याचा आग्रह करत होती. तिथं काहीतरी सेटअप असेल, ती त्याला मुद्दाम तिथं घेऊन जात आहे, मुलाचा हा संशय विश्वासात बदलला. त्याला माहित होतं की आजकाल अशी बरीच प्रकरणं आहेत जिथं मुली रेस्टॉरंटमध्ये जातात आणि महागड्या वस्तू ऑर्डर करतात.

5/5
तिने रागाने मुलाला सांगितलं की पुढे जा, ती नंतर येईल. मग तिने फोन केला आणि काहीतरी कारण देऊन येण्यास नकार दिला. मुलाला लगेच समजलं की तो सापळ्यात अडकणार होता पण सुदैवाने त्याने त्याचा जीव वाचवला. माझं काय झालं असतं माहिती नाही, असं म्हणत त्याने सुटकेचा निश्वास टाकला. आर/गाझियााबाद नावाच्या रेडिट अकाऊंटवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. इथं लोक उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहराशी संबंधित अनुभव शेअर करतात. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)

जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement