IPL मध्ये कुणी रुपया मोजला नाही, CSK ने वाऱ्यावर सोडलं, विदर्भाच्या पठ्ठ्यानं 5 शतकं ठोकून टीम इंडियाची दारं ठोठावली!

Last Updated:

Dhruv shorey 5th consecutive century : विदर्भचा फलंदाज ध्रुव शौरी याने एका मॅचमध्ये सलग पाचवे शतक झळकावून तामिळनाडूच्या एन. जगदीशन याच्या मोठ्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

Dhruv shorey 5th consecutive century
Dhruv shorey 5th consecutive century
Dhruv shorey VHT Record : राजकोटच्या सनोसारा क्रिकेट ग्राऊंडवर विजय हजारे ट्रॉफीच्या दुसऱ्या राउंडमध्ये विदर्भ विरुद्ध हैदराबाद यांच्यात एक थरारक मॅच पाहायला मिळाली. या मॅचमध्ये विदर्भच्या एका फलंदाजाने आपल्या बॅटचा तडाखा दाखवत हैदराबादच्या बॉलरना पूर्णपणे हतबल करून सोडले. आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करताना त्याने केवळ 77 बॉलमध्ये नाबाद 109 रन्सची खेळी साकारली आणि टीमला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले. या धडाकेबाज शतकामुळे विदर्भने हैदराबादवर 89 रन्सने दणदणीत विजय मिळवला असून या विजयाचा हिरो ठरलेल्या खेळाडूने क्रिकेटच्या इतिहासात एका खास रेकॉर्डची बरोबरी केली. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून ध्रुव शौरी आहे.

लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग सर्वात जास्त शतकं

विदर्भचा फलंदाज ध्रुव शौरी याने या मॅचमध्ये सलग पाचवे शतक झळकावून तामिळनाडूच्या एन. जगदीशन याच्या मोठ्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. शौरीच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग सर्वात जास्त शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आपले नाव अग्रक्रमाने कोरले आहे. त्याने आपल्या खेळीत शानदार फोर लगावत रन्सचा वेग कायम राखला. ध्रुव शौरी सध्या ज्या फॉर्ममध्ये खेळत आहे, ते पाहता त्याने टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुभमन गिल आणि इतर मोठ्या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
advertisement

बॅक टू बॅक शतकं

शौरीच्या या पाच शतकांचा सिलसिला गेल्या वर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीमधील नॉकआउट मॅचपासून सुरू झाला होता. त्याने क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल अशा महत्त्वाच्या मॅचमध्ये बॅक टू बॅक शतके केली होती. जरी फायनलमध्ये विदर्भला कर्नाटककडून पराभव स्वीकारावा लागला होता, तरी शौरीची बॅट शांत बसली नाही. या चालू सीजनच्या पहिल्या मॅचमध्ये त्याने बंगाल विरुद्ध 136 रन्स केले होते. गेल्या सीजनमध्ये त्याने 8 इनिंग्समध्ये एकूण 494 रन्स केले असून त्याचा फॉर्म विदर्भसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.
advertisement

रोहित-विराटचा रेकॉर्ड मोडला

या रेकॉर्डच्या निमित्ताने क्रिकेटमधील इतर दिग्गजांच्या कामगिरीचीही चर्चा होत आहे. तामिळनाडूच्या जगदीशनने 2022-23 च्या सीजनमध्ये सलग 5 शतके केली होती, ज्यात एका 277 रन्सच्या मोठ्या खेळीचा समावेश होता. तसेच करुण नायर आणि देवदत्त पडिक्कल यांनी सलग 4 शतके केली आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कुमार संगकाराने वनडे मध्ये सलग 4 शतके झळकावली आहेत, तर भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी सलग 3 शतके करण्याचा पराक्रम केला आहे. मात्र ध्रुव शौरीने आता या सर्वांच्या पुढे जात पाच शतकांचा टप्पा गाठला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL मध्ये कुणी रुपया मोजला नाही, CSK ने वाऱ्यावर सोडलं, विदर्भाच्या पठ्ठ्यानं 5 शतकं ठोकून टीम इंडियाची दारं ठोठावली!
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement