Gold Rate Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला स्वस्त झालं सोनं, चांदीही पडली 'फिकी', पाहा आजचे दर

Last Updated:
सोन्या चांदीच्या दरात दिल्लीत व मुंबईत मोठी घसरण, लग्नसराईपूर्वी ग्राहकांना दिलासा, इंडियन बुलियन असोसिएशननुसार दरात एक ते दीड हजार रुपयांची घट.
1/7
लक्ष्मीपूजनापासून सोन्या चांदीच्या दरवाढीला करकचून ब्रेक लागला आणि त्यानंतर घसरण सुरू झाली आहे. सोन्या चांदीच्या दरात सतत घसरण होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला मार्केट सुरु होण्याआधी सोन्या चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण दिसून आली. सकाळी मार्केट रेट घसरल्याने ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. लग्नसराईआधी दर घसरल्याने सोनं खरेदीसाठी पुन्हा एकदा सराफ मार्केटमध्ये गर्दी दिसणार आहे.

advertisement
2/7
नफा बुकिंग आणि अमेरिकेसोबतच्या टॅरिफवरील व्यापार चर्चेला वेग आल्याने सोन्याच्या किमती त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून लक्षणीयरीत्या घसरल्या. १० दिवसांपूर्वी २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति किलो १,३२,७७० रुपयांवर पोहोचली होती मात्र दर दणकून आपटले आहेत.

3/7
राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १० रुपयांनी कमी झाली आहे, आदल्या दिवसाच्या स्थिरतेपूर्वी ती ११५ रुपयांनी महाग झाली होती आणि त्यापूर्वी २० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या सलग पाच दिवसांत ती ५९५० रुपयांनी घसरली होती.  दिल्लीत दोन दिवसांपासून एक किलो चांदीची स्थिरता आज पुन्हा कमी झाली आहे.

4/7
मुंबईमध्ये एक तोळे 24 कॅरेट सोन्याचे दर 1,25,610 तर २२ कॅरेट सोन्याचे दर 1,15,140 रुपयांवर पोहोचले आहेत. एक ग्रॅम सोन्यासाठी 12,561 रुपये द्यावे लागणार आहेत. 22 कॅरेटसाठी 11 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहेत. 8 ग्रॅमसाठी 92 हजार रुपये 22 कॅरेटसाठी तर 1 लाख रुपये 24 कॅरेट 8 ग्रॅमसाठी ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.

5/7
सोन्या चांदीचे दर घसरल्याने लग्न सराईत खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 17 ऑक्टोबर रोजी 1 ग्रॅम सोन्यासाठी 13 हजार 277 रुपये मोजावे लागले होते. आता हे दर घसरल्याने पुन्हा सोनं खरेदीसाठी झुंबड उडू शकते. गोल्ड सिल्वर ETF मध्ये पुन्हा गुंतवणूक सुरू झाली आहे.

6/7
इंडियन बुलियन असोसिएशनच्या मते सोन्याच्या दरात जवळपास एक ते दीड हजार रुपयांनी घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्यासाठी 1 लाख 24 हजार रुपये तर 23 कॅरेट सोन्यासाठी 1 लाख २३ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. २२ कॅरेटसाठी 1 लाख 13 हजार, 18 कॅरेटसाठी 93 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

7/7
चांदीचे दर आज पुन्हा खाली आले आहेत. 999 शुद्ध चांदीसाठी 1 लाख 55 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. GST सह 1 लाख 52 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. आगामी काळात चांदी 2 लाख तर सोनं 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत जाईल असा तज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळे गुंतवणूक करावी असंही काहींचं म्हणणं आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement