Maharashtra Local Body Election: आधी नगरपालिका की जिल्हा परिषदेची निवडणूक? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने तारखेसह निवडणूक कार्यक्रम सांगितला!

Last Updated:

Maharashtra Local Body Election : आता, राज्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

आधी नगरपालिका की जिल्हा परिषदेची निवडणूक? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने तारखेसह निवडणूक कार्यक्रम सांगितला
आधी नगरपालिका की जिल्हा परिषदेची निवडणूक? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने तारखेसह निवडणूक कार्यक्रम सांगितला
संतोष दळवी, प्रतिनिधी, कर्जत-रायगड: राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे निवडणूक आयोगाने प्रभागरचना जाहीर केली असून आरक्षण सोडतही काढली आहे. आता, राज्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आउटगोईंग सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातही इनकमिंग सुरू झाले आहे. खोपोली येथील काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला. तर याआधी प्रवेश केलेल्यांना पक्षाच्या पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम खोपोली येथील रेडिसन ब्ल्यू येथे पार पडला. त्यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आगामी निवडणुकीबाबत भाष्य केले.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खोपोली येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संभाव्य वेळापत्रकावर भाष्य करत कार्यकर्त्यांना तयारीचे आदेश दिले. तटकरे म्हणाले की, राज्यातील नगरपालिका निवडणुकांची घोषणा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा एक आठवड्याच्या आत होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा अधिवेशन कार्यक्रम जाहीर झाल्याने आता निवडणुका जाहीर करण्यास अडथळा उरलेला नाही, असेही तटकरे यांन म्हटले.
advertisement
सर्वप्रथम नगरपालिका निवडणुका होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पार पडतील. या निवडणुका पार झाल्यानंतर अखेरीस महानगरपालिका निवडणुका घेण्यात येतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Local Body Election: आधी नगरपालिका की जिल्हा परिषदेची निवडणूक? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने तारखेसह निवडणूक कार्यक्रम सांगितला!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement