Weight Loss Tips : वजन कमी करायचंय, पेरू खावा की अॅव्होकाडो? योग्य निवडीने होईल वेट लॉस, इम्यूनिटीही वाढेल!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Avocado or guava which is best for weight loss : हल्ली फिट राहण्यासाठी आपले वजन कमी करण्यासाठी लोक प्रयत्न करतात. व्यायामासोबतच लोक आता डाएटकडेही तितक्याच बारकाईने लक्ष देत आहेत. म्हणूनच काय खावं आणि काय नाही याबद्दल अनेक प्रश्नही वाढले आहेत. आज आम्ही तुम्हाला अॅव्होकाडो आणि पेरू या दोन्ही फळांपैकी कोणते जास्त फायदेशीर आहे याबद्दल माहिती देत आहोत.
अ‍ॅव्होकाडोचे फायदे अनेक आहेत. मात्र बरेच लोक हे फळ महाग आहे म्हणून ते खाऊ शकत नाही. याउलट पेरू स्वस्त आहेत. मात्र त्याच्या फायद्यांबद्दल सोशल मीडियावर फारसं बोललं जास्त नाही. म्हणून बहुतांश लोकांना याबद्दल पुरेशी माहिती नाही. अ‍ॅव्होकाडो आणि पेरू हे दोन्हीही पोषक तत्वांनी समृद्ध फळे आहेत, ज्यांचे वेगवेगळे फायदे आहेत. चला पाहूया यापैकी कोणतं जास्त फायदेशीर.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वजन कमी करण्यासाठी कोणतं जास्त फायदेशीर : वजन कमी करायचे असेल तर पेरू जास्त फायदेशीर आहे. त्यात कॅलरीज कमी असतात आणि त्यात भरपूर फायबर असते. ते खाल्ल्याने तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाणे टाळता येते. यातील नैसर्गिक साखर, रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढवत नाही. अ‍ॅव्होकाडो निरोगी असतात, परंतु पेरूपेक्षा त्यात कॅलरीज जास्त असतात.
advertisement
advertisement
advertisement









