Pune Crime : 'तुझ्यासोबत लग्न करायचंय, मुलांना सोडून...', पुण्यातील विवाहित महिलेसोबत व्हॉट्सअॅप कॉलवर नको ते घडलं!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Crime Married woman harassed : एका पुण्यातील येवलेवाडी परिसरात एका विवाहित महिलेला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे त्रास देणाऱ्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Pune Crime News : गेल्या वर्षभरात पुण्यात सायबर गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय. अशातच आता सुरक्षित मानल्या जाणाऱ्या व्हॉट्सअॅपचं गैरवापर होताना देखील सर्रास पहायला मिळतंय. अशातच आता पुण्यातू धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका पुण्यातील येवलेवाडी परिसरात एका विवाहित महिलेला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे त्रास देणाऱ्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मला तुझ्याशी लग्न करायचंय...
व्हॉट्सअॅप कॉलद्वारे एका विवाहित महिलेला वारंवार त्रास दिला जात होता. "मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तू तुझ्या पतीला आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये," अशी मागणी करत आरोपीने महिलेची छेड काढली. या धक्कादायक प्रकारामुळे पीडित महिलेने मानसिक त्रासापोटी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली आहे.
वारंवार फोन करून आणि अवाजवी मागण्या
advertisement
या प्रकरणी 33 वर्षीय विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सोन रूपचंदानी याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार 28 जानेवारी रोजी घडला असून, आरोपीने महिलेच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. वारंवार फोन करून आणि अवाजवी मागण्या करून त्याने महिलेला त्रस्त केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
कडक कारवाई करण्याची मागणी
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे वारंवार त्रास दिला. त्याने केलेल्या व्हॉट्सअॅप कॉलमध्ये केवळ लग्नाची मागणीच केली नाही, तर तिला तिच्या कुटुंबापासून वेगळं होण्यासाठी दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला. सोशल मीडिया आणि कॉलिंग ॲप्सचा गैरवापर करून महिलांची सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मोबाईल रेकॉर्डचीही तपासणी करण्याची शक्यता
advertisement
दरम्यान, येवलेवाडी पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपीने अशाच प्रकारे इतर कोणाला त्रास दिला आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आणि महिलांच्या संरक्षणासाठी पोलीस आता आरोपीच्या मोबाईल रेकॉर्डचीही तपासणी करण्याची शक्यता आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 10:07 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Pune Crime : 'तुझ्यासोबत लग्न करायचंय, मुलांना सोडून...', पुण्यातील विवाहित महिलेसोबत व्हॉट्सअॅप कॉलवर नको ते घडलं!










