महाराष्ट्रातून होणार दुसरी ‘बुलेट ट्रेन’, प्लॅन ठरला, कुठून कुठं धावणार? प्रवासाचा वेळ किती?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Bullet Train: सध्या अहमदाबाद–मुंबई हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. आता महाराष्ट्रातून आणखी एक बुलेट ट्रेन धावणार आहे.
मुंबई: अहमदाबाद ते मुंबई या देशातील पहिल्या ‘बुलेट ट्रेन’चे काम वेगात सुरू आहे. अशातच केंद्र सरकारने महाराष्ट्राला आणखी एक मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा केलीये. त्यामुळे महाराष्ट्रातून लवकरच आणखी एक बुलेट ट्रेन धावणार असून मुंबई ते पुण्याचा प्रवास अवघ्या 48 मिनिटांत होणार आहे.
मुंबई-पुणे 48 मिनिटांत
महाराष्ट्रासाठी मुंबई–पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर गेमचेंजर ठरणार आहे. या मार्गावरील 170 किलोमीटरचा प्रवास केवळ 48 मिनिटांत पूर्ण होणार आहे. सध्या रस्ता किंवा रेल्वेमार्गे तीन ते चार तास लागणारा हा प्रवास भविष्यात निम्म्याहून कमी वेळेत पार पडणार आहे.
advertisement
मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्राची आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक केंद्रे मानली जातात. या दोन शहरांदरम्यान हायस्पीड रेल्वे सुरू झाल्यास उद्योग, आयटी, शिक्षण, पर्यटन आणि रोजगार क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार असल्याने कार्बन उत्सर्जनातही लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे.
पुणे-हैदराबाद प्रवास 1 तास 55 मिनिटांत
मुंबई-पुणे-हैदराबाद या 767 किमीच्या प्रकल्पामुळे ताशी 220 ते 350 किमीने प्रवास होईल. या संपूर्ण मार्गावर 11 थांबे असतील. पुणे-हैदराबाद दरम्यान ही बुलेट ट्रेन जवळपास 550 किलोमीटरचे अंतर अवघ्या 1 तास 55 मिनिटांत पार करेल. यामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणामधील आर्थिक व औद्योगिक संबंध अधिक बळकट होतील.
advertisement
विक्रमी आर्थिक तरतूद
अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी 2.77 लाख कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2026-27 साठी रेल्वे मंत्रालयाला 2,77,830 कोटी रुपये भांडवली खर्चासाठी मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये मोठा खर्च कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर होत असून 2024–25 मधील 58,844 कोटी रुपयांचा पेन्शन खर्च 2026–27 मध्ये सुमारे 74,500 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान, सध्या अहमदाबाद–मुंबई हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यानंतर मुंबई–पुणे-हैदराबाद हा देशातील महत्त्वाच्या हायस्पीड रेल्वे मार्गांपैकी एक ठरणार आहे. हायस्पीड रेल्वे प्रकल्पांमुळे भारताच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असून महाराष्ट्र या बदलाचा प्रमुख लाभार्थी ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 9:47 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
महाराष्ट्रातून होणार दुसरी ‘बुलेट ट्रेन’, प्लॅन ठरला, कुठून कुठं धावणार? प्रवासाचा वेळ किती?










